झावरे कुटुंबामुळे ढवळपुरी परिसराचे नंदनवन : बबनराव पवार

ढवळपुरी येथे सभामंडप व रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन
दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
ढवळपुरी गावच्या पूर्व भागामध्ये एकेकाळी रस्ता वीज अशा कोणत्याच सुख सुविधा सोयी नव्हत्या. त्यामुळे या भागात सोयरीक सुद्धा होत नव्हती. या भागात स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांनी काळूडॅम सारखा प्रकल्प उभा केला. त्यामुळे या भागातील कृषी जीवनमान बदलले तसेच अनेक विकासाची कामे त्यांच्या काळात मार्गी लागली आता सुद्धा सुजितराव झावरे पाटील गावच्या विकासामध्ये योगदान देत आहेत. गावातील आज अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने ढवळपुरी परिसरामध्ये नंदनवन फुलले आहे. झावरे कुटुंबाने ढवळपुरी गावावर विशेष प्रेम केले आहे. असे मत ज्येष्ठ नेते ढवळपुरी गावचे उपसरपंच बबनराव पवार सर यांनी व्यक्त केले. ढवळपुरी येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ढवळपुरी येथील मशनेर बाबा सभामंडप बांधणे. तसेच व्यवहारे मळा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे सदर विकासकामांचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य पोपटराव चौधरी, अमोल साळवे, उपसरपंच बबनराव पवार सर, सुधाकर आण्णा गावडे, बाबाजी चौधरी, अहमद पटेल, मच्छिंद्र व्यवहारे (ग्रा.प.सदस्य) बबन कन्हे (ग्रा. प. सदस्य), संभाजी ढेकळे (ग्रा.प.सदस्य) संदिप शोरान, रमेश केदारी, रामदास भालेराव, बाजीराव ठोकळ, बाबाजी चौधरी, शिवाजी खोडदे, प्रदिप साळवे सर, माजी सरपंच होनाजी घोगरे, बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब व्यवहारे, बाबा पारखे, अहमद पटेल, खुदा शेख, काजल सांगळे, बंडु व्यवहारे, संदिप व्यवहारे, वैभव गावडे, भाऊसाहेब आनंदकर, सोनू कुटे, गंगाराम चितळकर, रभाजी पारखे, गणेश पारखे, मुश्शाक पटेल, असलम पटेल, शिवाजी चौधरी, अनिल धायगुडे, अविनाश डोमाळे, दात्रय वलेकर, प्रदिप दळवी, मल्हारी राके, बापुसाहेब खताळ, बी जी. पवार, सुंदर पवार, खोडाजी ठोंबरे, साहेबराव राठोड, विश्वनाथ मधे, प्रवीण जाधव, विनोद पवार, रोहिदास पवार, बापूसाहेब खताळ, बाबाजी सांगळे, दगडु लालू पवार, भालेकर गुरूजी, संभा ढेकळे, बबन करे, संपत कुटे, आप्पासाहेब कुलाळ, दशरथ झिटे, बबन जाधव, काळूराम टकले, गंगाराम टकले, भिमा करगळ, दुधाजी करगळ, आप्पा डोमाळे, बजरंग करगळ, रवींद्र पवार, व्होणाजी पवार, अशोक पवार, दौलत कोकाटे, बंडू ठोंबरे, तानाजी कुलाळ, वलाजी राठोड, दौलत बरकडे, गजानंद टकले, संजय राठोड, कॉन्ट्रॅक्टर इंजि. निकिल दाते व लालू नाईक तांडा, धनगर वाडा व ढवळपुरी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
