राजापूर महाविद्यालयात वाणिज्य दिवस साजरा

संगमनेर-प्रगतीक शिक्षण संस्थेचे,नूतन कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,राजापूर या ठिकाणी वाणिज्य विभागांतर्गत जागतिक वाणिज्य दिवस उत्साहात साजरा केला.
जागतिक वाणिज्य दिवसाचे औचित्य साधून “Career Opportunities In Commerce” या विषयावर संगमनेर महाविद्यालय,संगमनेर च्या वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका डॉ.एच.बी.पंजाबी यांनी विद्यार्थ्यांना कॉमर्स मधील करिअरच्या विविध संधीचे मार्गदर्शन केले.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात करिअर संबंधी निर्णय घेताना नक्कीच लाभ होईल. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कडलग,उपप्राचार्य व संस्थेचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.तसेच या कार्यक्रमासाठी डॉ.जांगिड एस.आर.या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका देशमुख मॅडम,प्रास्ताविक कॉमर्स विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका गुंजाळ आर.एस.व प्राध्यापिका खतोडे पी.एम.यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक गोफणे आर. एल.हे अध्यक्ष होते.हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.