
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात कोतुळ येथील अण्णांभाऊ साठे नगर येथील मातंग वस्ती मधील अवैध दारु विक्री बंद करावी अशी मागणी परिसरातील नागरिकां नी केली आहे
या ठिकाण च्या अवैध दारू ने अनेकन दिवसापासून धुमाकूळ घातला आहे यामुळे अनेक गोर गरीब कुटुंबाचा संसार देशोधडीला लागत असुन दारुच्या नशेने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे अवैध दारूने गावातील शांतता बिघडण्याचे काम सुरू केले आहे
असे असतानाही अकोले पोलीस व दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे
या बाबत अनेकदा ग्रामपंचायतीने सुचना देऊनही या अवैध्य दारु विक्री बाबत त्यांचे डोळे उघडले नाही त्यामुळे दिवसभर मजुरी करणारे शेतकरी मजुर रात्रीला सहजरित्या दारु मिळत असल्याने दारुच्या आहारी जाऊन दिवसभराची मजुरी वाया घालवीत आहेत
कोतुळ येथील अवैध्य बेकायदेशीर दारु विक्री यां वर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे
एसटी बसस्थानका समोरच हा व्यवसाय खुले आम सुरू आहे गावातील व खेड्यातील महीलांना आई बहीनी याचा त्रास सहन करावा लागत आहे
एका दिवसाला किमान 20 /ते 25 बॉक्स दारूचे विक्री होत असल्याचे दुसून येते यातून मिळणाऱ्या अवैध कमाई चा हिस्सा काही पोलीस व दारूबंदी उत्पादन शुल्क च्या अधिकाऱयांना जात असल्याने प्रत्येक वेळी जुजबी कारवाई करून या कडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप Stomach रहिवाशी करत आहे पोलिसांच्या आशीर्वादातून हे व्यवसाय सुरू असल्याने त्यांची मुजोरी वाढत चालली आहे याववर वेळीच आवर न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे