सार्वजनिक उद्योगातील कामगारांची दिल्लीत तीव्र निदर्शने!

सरकारच्या चुकीच्या धोरनाचे विरोधात कामगार एकवटले!
दिल्ली दि १८
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, एल आय सी, रेल्वे, संरक्षण, खाण ऊद्योग , ऐन टी पी सी ,स्टील , आदी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या सरकारच्या खाजगीकरण, स्वःतत्र महामंडळ (CORPORSATION ) धोरण च्या विरोधात भारतीय मजदूर संघांने काल दि १७ नोव्हेंबर रोजी जंतर मंतर दिल्ली येथे तीव्र निदर्शने केले
सरकारच्या या खाजगीकरण धोरणाला विरोध केला. तसेच या वेळी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातील सद्यस्थीती व कामगारांच्या विविध समस्या या बाबतीत भारत सरकार ला निवेदन दिले. यावेळी विविध राज्यातील, सार्वजनिक उद्योगातील हजारो कामगार सहभागी झाले होते. यावेळी भारतीय मजदूर संघ च्या केंद्रीय पदाधिकारी यांनी सरकार च्या खाजगीकरण, धोरणाचा पुर्नविचार करावा अशी मागणी केली आहे.
भारतीय मजदूर संघाच्या महत्वपूर्ण मागण्या –

1) सार्वजनिक क्षेत्र , सार्वजनिक उपक्रमातील नवरत्न कंपन्या व सरकारी ऊद्योगातील खाजगीकरण थांबवा.
2) आजारी उद्योगांचे पुनर्जीवन करा .
3) प्रतिरक्षा ऊद्योगांचे निगमीकरण (CORPORATION) करू नका.
.4) सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे एकत्रीकरण करू नका.
5) वीमा कंपनी च्या खाजगीकरणास सक्त मनाई करा.
6) कोल उद्योगातील कर्मशीयल माईनिंग प्रक्रियेस प्रतिबंध करावा.
7) सार्वजनिक ऊद्योग , सरकारी उद्योगात नोकर भरती सुरू करा.
8) सार्वजनिक ऊद्योगातील व सरकारी ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करा.अशा महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह आणि अवजड ऊद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री श्री महीद्रनाथ पांडे यांना दिले.

भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय महामंत्री श्री रविंद्र हिमते, श्री ऐस मल्लेशम, श्री गिरीश आर्या, श्री एम पी सिंह, श्री अशोक शुल्का, श्री रामनाथ गणेशे, श्री लक्ष्मा रेड्डी, श्री डी के पांडे, श्री मुकेश कुमार सिंह, श्री मंगेश देशपांडे, श्री मानत पाल, श्री साधू सिंह, श्री आर वेंलगराव आणि श्री पवनकुमार सहभागी होते.
या आंदोलनात महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातील संरक्षण, बॅंका, ऐल आय सी, रेल्वे, उद्योगातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. असे अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सचिन मेंगाळे यांनी सांगितले
