इतर

शेवंगावात


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील जोहरापुर येथील वनेश्वर हनुमान मित्र मंडळ जोहरापुर ग्रामस्थ व यश फाउंडेशन यांच्या वतीने तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षात आपत्ती व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शहरटाकळी येथील ‘पाणीवीर’ व तालुक्यातील नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा मंगळवार (ता.१३)साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अशोकराव देवढे यांनी दिली.
शेवगाव तालुक्यातील अनेक गावातून कुठल्याही क्षेत्रातून उत्तुंग भरारी घेत तालुक्याचे व गावाचे नाव जिल्ह्याच्या पटलावर घेऊन जात असतात. त्याची दखल घेत वनेश्वर हनुमान मित्र मंडळ व यश फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी अशा
गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित केला जात असतो. त्याचप्रमाणे पाणीवीर यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या सन्मान सोहळ्यात ‘पाणीवीर’ अरुण शांतीलिंग लोखंडे, नारायण बबन मिसाळ, राजेंद्र मथाजी गादे,यांचा तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भावीनिमगाव येथील आत्माराम सखाराम तोरमड यांचा तर अशोक संतराम दिंडे दिंडेवाडी, प्रवीण साहेबराव राशिनकर, निंबेनांदूर ,कुमारी स्नेहल बाळासाहेब खंडागळे दहिगांवने ,कुमारी कल्याणी एकनाथ नजन यांचा पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याने तर जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ लेखाधिकारी पदासाठी निवड झालेल्या प्रतीक्षा आप्पासाहेब फटांगरे या सर्वांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे.
कार्यक्रमासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,जयंत वाघ पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी, दिलीपराव लांडे माजी सभापती, प्रसाद मते प्रांतसाहेब शेवगाव पाथर्डी, प्रशांत सागडे तहसीलदार शेवगाव, दिगंबर भदाणे पी एसआय शेवगाव,श्री प्रकाश पाटील संपादक दैनिक सकाळ अहमदनगर आवृत्ती प्रमुख, तसेच परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सेवासंस्थेचे चेअरमन, व्हा चेअरमनसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येनेउपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button