अहमदनगरइतर

शेवगाव च्या न्यू आर्टस महाविद्यालयात भव्य ग्रंथप्रदर्शन


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयातील ग्रंथालय विभागात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या १३२ जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.डॉ. युवराज सुडके व उपप्राचार्य मा. भाऊसाहेब अडसरे यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक व ग्रंथालय शास्त्राचे पितामह डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिन राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रंथालयांच्या विकासात डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा खप मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामुल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथान यांनी मांडला आणि त्यासाठी त्यांचे सर्व आयुष्य झिजवले. शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण किती महत्वाचे आहे हे पटवून देवून समाजाला साक्षर व सुशिक्षित करण्यासाठी ग्रंथालयासारखे दुसरे मध्यम नाही हे ओळखून डॉ. रंगनाथन यांनी १९२८ साली मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली. या ग्रंथालय संघाचे कायद्याने संरक्षण व्हावे म्हणून सार्वजनिक ग्रंथालय कायदा अस्तित्वात आणला. डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्रात दिलेले योगदान महत्त्वाचे व मोलाचे आहे. डॉ. रंगनाथन यांना रावसाहेब, डिलिट, पद्मश्री आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. याच दिनाचे औचित्य साधुन भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले यात मराठी, हिंदी इंग्रजी तिन्ही भाषेतील कथा कादंबरी, नाटक, सर्व विषयाची संदर्भ ग्रंथ, विश्वकोश, ज्ञानकोश, चरित्रकोश, सरिता कोश, सांस्कृतिककोश, शब्दकोश, वार्षिक, प्रवासवर्णन, आत्मचरित्र अशा सर्व प्रकारच्या ग्रंथांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे वाचकांना आपल्या ग्रंथालयात असलेल्या ग्रंथाची ओळख होते व त्या ग्रंथाची मागणी होते अशी माहिती ग्रंथपाल मिनाक्षी चक्रे यांनी दिली. ग्रंथप्रदर्शन भरून ग्रंथालय हे वाचन संस्कृती वाढवण्यात मदत करते हा ग्रंथालयाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत उपप्राचार्य डॉ. सुडके यांनी व्यक्त केले. या प्रदर्शनास महाविद्यालयातील डॉ. संदीप मिरे, प्रा. मोहन वेताळ, प्रा. विजय देवरे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व ११ वी. व १२ वी. च्या वर्गांनी भेटी दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल मिनाक्षी चक्रे, बाळासाहेब आठरे, नंदू बर्डे, यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button