शांता शेळके यांना नारी शक्ती पुरस्कार!

अकोले ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने कोतुळ येथील विडी कामगार महिला सौ. शांता अशोक शेळके यांना आपले तीन मुले शासकीय सेवेत रुजू झाले बद्दल नारी-शक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्ती सन्मान सोहळा सरला बेटाचे मठाधीपती प.पु. रामगिरी महाराज व आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे हे होते. शिवव्याख्याते प्रदीप कदम, विभागीयध्यक्ष दशरथ चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, आनंद दिघे इंग्लिश स्कुल चे सचिव अनिल राहणे उपस्थित होते.
सौ. शांता अशोक शेळके यांनचे सुपुत्र शिवा उर्फ संतोष अशोक शेळके हा मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर असून तर एम पी एस सी च्या परीक्षेत तो क्लासवन ची परीक्षा पास झाला आहे. दुसरी कन्या भारती शेळके ही आरोग्य विभागात ठाणे येथे तिसरी कन्या पूजा शेळके आरोग्य विभागात पुणे येथे निवड झाली आहे. मोठी कन्या वैजयंता अशोक शेळके ही एम, एस, डब्लू, झाली आहे ती विवाहबद्ध झाली अत्यंत खडतर परिश्रमातून मुलांना घडविण्याचे विशेष कार्य केल्याने याचे सौ. शांता शेळके यांचे सह अशोक शेळके यांना आहे.
शिर्डी येथील सत्कार स्वीकारणेसाठी सपत्नी अशोक शेळके त्यांचे बंधू एकनाथ शेळके,पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे व अशोक उगले,सुनील गीते उपस्थित होते.