सर्वोदय विदया मंदिर राजूर येथे वृक्षदिंडी!

अकोले/प्रतिनीधी –
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षिही सुस्वरे आळविती.या काव्यपंक्तीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त टाळ मृदुंगाच्या निनादात,हरी नामाच्या गजरात राजूर येथे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.एन.सी.सी.पथक, हारीत सेना, वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातत झेंडे,डोक्यावर तुलसीवृंदावन,ज्ञानोबा माऊलीचा एकच गजर करत,वृक्ष लावा दारोदारी समृद्धी होईल घरोघरी,झाडे लावा झाडे जगवा,पर्यावरण वाचवा आदी घोषणा देत पालखी सोहळयाने संपूर्ण राजूर नगरी दुमदुमली.
या प्रसंगि वृक्षप्रेमी डॉ.रमाकांत डेरे, प्राचार्य बादशहा ताजणे, उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,पर्यवेक्षक सदाशीव गिरी, क्रीडाशिक्षक जालिंदर आरोटे, यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विदयार्थी सहभागी झाले होते.
यावेळी डॉ.रमाकांत डेरे यांनी प्रबोधन करताना, झाडे हे आपले जीवनाचे सार आहे.प्राणी,पशू,मानव आदींना आपल्या छायेचा आश्रय देतात.झाडांशिवाय पृथ्वीवरील जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे.म्हणूनच प्रत्येकाने किमान दरवर्षी एकतरी झाड लावा.हीच पांडूरंगाची वारी असल्याचे विचार व्यक्त केले.
विद्यालयाचे नवनिर्वाचीत प्राचार्य बादशहा ताजणे यांनी उपस्थितांचे स्वागत करत झाडे ऑक्सीजन पुरवून, हवेची गुणवत्ता सुधारतात. शुद्ध प्राणवायू देतात.पर्यावरणाचा समतोल साधला जातो.त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा असे अव्हान केले.वृक्षदिंडी
पालखी सोहळयामध्ये कलाशिक्षक रावसाहेब पांडे व किशोर देशमुख यांच्या कल्पक्ततेतून विठ्ठल रुख्मिनीची वेशभुषा केलेले विद्यार्थी खास आकर्षण ठरले
कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्रीकांत घाणे यांनी केले.सुत्रसंचलन शरद तुपविहीरे यांनी केले.
