आजचे पंचांग व राशिभविष्य दि १८/०८/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २६ शके १९४६
दिनांक :- १७/०८/२०२४,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५३,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति २७:०५,
नक्षत्र :- उत्तरषाढा समाप्ति १०:१५,
योग :- आयुष्यमान समाप्ति ०७:५१, सौभाग्य २८:२८,
करण :- गरज समाप्ति १६:३२,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:१८ ते ०६:५३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५८ त १२:३३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०८ ते ०३:४३ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
भद्रा २७:०५ नं.,
————–
: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २७ शके १९४६
दिनांक = १८/०८/२०२४
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
माहीत नसलेल्या कामात लक्ष घालू नका. ठरवलेले विचार अचानक बदलू नका. वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य लाभेल. परदेश कंपनी कडून लाभाचे योग. उत्पन्नात वाढ होईल.
वृषभ
हातातील कामाला यश लाभेल. शेजार्यांची मदत घेता येईल. धन वृद्धीचे योग जुळून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल.
मिथुन
नवीन कामात हात घालू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ शक्य. मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकते. कौटुंबिक वातावरण जपावे. मनोबल वाढीस लागेल.
कर्क
काटकसरीपणाचा फायदा होईल. दुसर्याच्या स्वभावातील दोष दर्शवू नका. आजचा दिवस लाभदायक. ज्येष्ठ व्यक्तींचे अमूल्य सहकार्य लाभेल. कार्य शक्तीचे कौतुक केले जाईल.
सिंह
इतरांना सल्ला देण्याचे काम उत्तम करू शकाल. नेहमीसारखी आनंदी वृत्ती जागृत ठेवा. तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल. तुमच्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडू शकेल. सारासार विचार लाभदायक ठरेल.
कन्या
आजूबाजूचे धूर्त लोक ओळखून रहा. लपवाछपवी च्या गोष्टी करू नका. धन संचयात वाढ होण्याची शक्यता. बचतीच्या योजना आखाल. मागे हटू नका.
तूळ
स्वत:च्या मतावर ठाम रहा. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. कामात सुलभता जाणवेल. प्रलंबित योजना मार्गी लावाल.
वृश्चिक
आग्रहाला बळी पडू नका. मोठे काम करताना सावधानता बाळगावी. तीव्र इच्छा जागृत ठेवावी. वस्तु खरेदी करताना चोखंदळ रहा. अन्यथा नुकसान संभवते.
धनू
विद्यार्थ्यांना उत्तम काळ राहील. संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने सोडवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. क्षुल्लक गोष्टीने खट्टू होऊ नका.
मकर
नवीन कामात आळस करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. योग्य संधीची वाट पाहावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या स्वरुपात काहीसा बदल संभवतो.
कुंभ
मनातील विचार बोलून दाखवा. चुकीच्या विचारणा प्रयत्नपूर्वक दूर सारा. आर्थिक गोष्टींकडे कटाक्षपणे लक्ष द्या. विवाह इच्छुक असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल. नेतृत्व गुण वाढीस लावा.
मीन
इतरांचे प्रेम संपादन करा. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संपर्कात याल. मुलांना नवीन संधि लाभू शकते.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर