इतर

आजचे पंचांग ,दिनविशेष व राशिभविष्य, दि ०३/१०/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ११ शके १९४५
दिनांक :- ०३/१०/२०२३,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:१५,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति २९:३३,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति १८:०४,
योग :- वज्र समाप्ति ०८:१७,
करण :- कौलव समाप्ति १७:४७,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- मंगळ – तुला १७:५८,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०६नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:१७ ते ०४:४६ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४९ ते १२:१८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:१८ ते ०१:४७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:१७ ते ०४:४६ पर्यंत,

❀ दिन विशेष:
पंचमी श्राद्ध, दग्ध २९:३३ प.,
————–

:

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ११ शके १९४५
दिनांक = ०३/१०/२०२३
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
आपण ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील. अडथळ्यांची शर्यत पार कराल. व्यापारी वर्गाला प्रगतीकारक दिवस. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

वृषभ
घरामध्ये वेळ खर्च होईल. पण त्यातून समाधान मिळेल. दिवसभर मन प्रसन्न राहील. नवीन कार्याला चांगला दिवस. प्रयत्नात कसूर करू नका.

मिथुन
बोलण्यात माधुर्य कायम ठेवा. कचेरीची कामे मार्गी लागतील. कठीण कामे सुलभतेने करू शकाल. व्यावहारिक बाबीत सर्व गोष्टी तपासून पहा. एकंदर व्यवहाराचा आढावा घ्यावा.

कर्क
जुनी उधारी वसूल होईल. मिळकतीत वाढ होईल. हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कौटुंबिक वातावरणात रमून जाल. अधिकारी व्यक्तींची भेट होण्याची शक्यता.

सिंह
घेतलेला निर्णय कायम ठेवा. आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. जुन्या मित्रांशी आशादायक संवाद घडेल. प्रेमप्रकरणात पुढाकार घ्याल.

कन्या
नवीन संधीकडे लक्ष ठेवा. अती श्रमाचा ताण जाणवेल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल.

तूळ
कामाचा जोर कायम ठेवावा. कामाच्या ठिकाणी मान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. अघळ पघळ बोलू नका. स्त्रियांच्या सहवासात रमाल.

वृश्चिक
द्विधा मन: स्थितीत निर्णय घेऊ नका. कामावरून लक्ष उडू देऊ नका. लोकप्रियतेत वाढ होईल. प्रलोभनाला भुलू नका. मित्रांच्यात वाहवा होईल.

धनू
व्यावसायिक निर्णय घाईने घेऊ नका. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. विरोधक पराभूत होतील. राजकीय सहकार्य लाभू शकेल. रोखीचे व्यवहार सावधानतेने करा.

मकर
जुनी येणी वसूल होतील. मित्रांच्या भेटीचे योग येतील. अचानक धनलाभाची शक्यता. शेअर्स मध्ये गुंतवणूक करा. इच्छेविरूद्ध प्रवास करावा लागू शकतो.

कुंभ
मित्रांची योग्य पारख करा. अती तिखट पदार्थ खाऊ नका. जोडीदाराच्या सहवासात आनंद लाभेल. उत्तम कार्यशैली वापराल. क्षुल्लक मतभेदाकडे दुर्लक्ष करा.

मीन
पित्त विकाराचा त्रास जाणवेल. चारचौघांत तुमची वाहवा होईल. कोणावरही अती विश्वास टाकू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. मानसिक स्वास्थ्य जपावे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button