कीर्तनातून अध्यात्मा बरोबर सामाजिक प्रबोधनाची गरज – महेश महाराज काळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
धकाधकीच्या व धावपळीच्या जगात जगत असताना सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी अध्यात्म हाच एकमेव पर्याय आहे. जीवनातील प्रत्येक गोष्टीचे उत्तर आपल्या पौराणिक ग्रंथात सापडते. त्यासाठी अध्ययन महत्त्वाचे आहे. म्हणून आता अध्यात्मा बरोबर समाज जागृती करून धर्म संस्कारा बरोबर सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. असे मत स्वयंभू काळेश्वर देवस्थान गुंफ्याचे महेश महाराज काळे यांनी व्यक्त केले.
शेवगाव – नेवासा राज मार्गावरील भातकुडगाव फाट्यापासून जवळच असणाऱ्या श्री क्षेत्र गुंफा येथील स्वयंभू श्री काळेश्वर देवस्थानच्या प्रांगणात श्रावण पर्वणी निमित्त आयोजित सोमवार निमित्त कीर्तन महोत्सवात महाराज बोलत होते.यावेळी तरुणांनी परमार्थाकडे वळले पाहिजे संत ज्ञानोबा तुकोबाच्या ग्रंथ संपदेची विचारधारा समाजाला समजावून सांगण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी सामाजिक प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे.अनेक संतांच्या ग्रंथरूपी विचार आपल्याला जीवन जगण्याची ऊर्जा देतात अशा ग्रंथांचे अध्ययन घडले पाहिजे, यासाठी आता समाज जागृती होणे गरजेचे आहे. स्वयंभू काळेश्वर देवस्थानचा माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांच्या माध्यमातून परिसराचा होत असलेला विकास भूषणावह आहे.यावरही त्यांनी भाष्य करून परिसराच्या वतीने घुले कुटुंब यांचे आभार मानले.
यावेळी काळेश्वर संस्थांचे लहानु महाराज कराळे, यश महाराज साबळे, दत्ता महाराज जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले,उज्वलाताई मेरड, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, बाळासाहेब काळे,ज्येष्ठ पत्रकार आर आर माने, भास्कर चोपडे, संतोष आहेर, संजय आहेर, शेषेराव काळे, दिलिप सांवत, विठ्ठल चोरमारे, विजय नजन, विजय काळे, सोपान नजन, पांडुरंग गडाख,भाऊसाहेब आहेर, आसाराम खंडागळे, जालिंदर आहेर, नवनाथ आठरे, दत्तादेवा गोसावी, बाळकृष्ण तोगे, प्रवीण खंडागळे, नितीन खंडागळे, परसराम खंडागळे,आप्पासाहेब कमानदार, महादेव आहेर, अशोक हंडाळ, नंदकिशोर नजन, जालिंदर नजन, सचिन पानसंबळ, सुधाकर गरड, अमोल खंडागळे, सोमनाथ झेंडे, भारत चोपडे याच्यासह काळेश्वर तरुण मंडळ, काळेश्वर सप्ताह कमिटी गुंफा व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अशोकराव फटांगरे यांच्या वतीने महाप्रसादाची पगंत देण्यात आली.
दिनांक १९/०८/ २०२४ रोजी तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील सौभाग्यवती राजश्रीताई घुले यांच्या शुभहस्ते सकाळी महाअभिषेक होईल व सायंकाळी ७ ते ९ या वेळेत दत्तात्रेय महाराज जाधव यांचे हरिकीर्तन होईल. कीर्तनानंतर सामुदायिक महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. तरी या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर यांनी स्वयंभू काळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने केले आहे.