इतर

धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न वेदना निर्माण करतात – गोकुळ दौंड


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
पाच दशकांपेक्षाही अधिक काळ होऊनही आजही जायकवाडी धरणाने विस्थापित झालेल्या धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून वेदना निर्माण होतात. शेवगाव, पैठण, गंगापूर व नेवासा या तालुक्यातील १०९ गावे विस्थापित झाली. काळी भोर सुपीक जमीन जायकवाडी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. मात्र ज्यांच्या जमिनी या प्रकल्पात संपादित झाल्या अशा अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले. अनेकांना शासनाने जमिनी दिल्या तर अजूनही काहींना जमिनी व राहण्यास घर मिळाले नाही. आनेकांना दिलेल्या जमिनीत किंवा लाभधारकांना आजही जमिनी कसण्यासाठी वीज, पाणी आणि रस्ते निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.नोकरीतही प्रकल्पग्रस्तांना राखीव जागेवर न्याय मिळण्यासाठी अनेक सुशिक्षित बेरोजगार लढा देताना पाहिल्यावर अशा धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न आजही डोळ्यात पाणी आणतात.यासाठी आपण मोठ्या ताकतीने लढा उभारून धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा शब्द जिल्हाभाजपाचे गोकुळभाऊ दौंड यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय बैठकांचा चालू असलेल्या सत्रातील भाग म्हणून शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र आर्ले यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर नवीन मजलेशहर (खिर्डी ) येथे भारत महाराज लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहला भेट देऊन त्यांनी धरणग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. लवकरच आपण शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातील जनतेशी संवाद यात्रेच्या निमित्ताने भेटणार आहोत अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांचे औक्षण करून फटाके फोडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी हरिभाऊ लोढे, ज्ञानदेव फासाटे, उत्तम फटांगरे, दिनकर फटांगरे, रामभाऊ आर्ले, अशोक पिसोटे,भीवा पाचे,गुलाब शेख, कमलभाई पठाण, इमामभाई पठाण, बीबीषण आहेर, मन्सुर पठाण, हुसेन पठाण, पोपट पठाण, गंगाराम डमाळ, आदिनाथ घुले,शंकर लोढे, अमोल म्हसरूप,अशोक हरिभाऊ लोढे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


देशात आलेल्या कोरोना सारख्या महामारीच्या काळात गोकुळभाऊ दौंड यांच्याकडे असलेल्या पद व प्रतिष्ठेच्या जोरावर जनसामान्यांना मदतीचा हात देऊन अनेकांना संकटातून बाहेर येण्यासाठी मदत व आधार दिला.हे सत्य मतदार संघातील जनतेसमोर आहे.हे काम मतदार संघाच्या सामान्य जनतेच्या मनात आहे ते निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितच समोर येईल.सामान्य कष्टकरी जनतेसाठी झटणाऱ्याना जनता नेहमीच डोक्यावर घेते याचा प्रत्यय आगामी निवडणुकीत दिसेल.

मच्छिंद्र आर्ले
स्वाभिमानी शेतकरी संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button