भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमित्ताने काकनेवाडी येथे अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
श्रीक्षेत्र काकनेवाडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. दि 20 ऑगस्ट पासून प्रारंभ होत असून 27 ऑगस्ट रोजी हभप बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होत आहे.
या सप्ताह मध्ये हभप डॉ मिसाळ महाराज, डॉ जाधव महाराज, हभप येवले महाराज, हभप दळवी महाराज, हभप सदगीर महाराज व काकनेवाडी गावचे भूमिपुत्र हभप रंगनाथ महाराज वाळुंज यांची किर्तन सेवा होणार आहे.
काकनेवाडी गावात सप्ताह बरोबरच इतर सामाजिक उपक्रम ही राबवले जातात. मागील वर्षी पर्जन्य यज्ञ व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या ही वर्षी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात सर्व प्रवचन हे गावातील धार्मिक आवड असणाऱ्या विद्यार्थांनी ठेवले असल्याची माहिती हभप रामदास महाराज वाळुंज यांनी दिली.
सप्ताह मध्ये गावातील सर्व ग्रामस्थ आनंदाने सहभागी होत असून गावातील सर्व तरुणांचे मोठे योगदान असते. काकनेवाडी आणि काकनेवाडी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या ज्ञान दान आणि अन्न दानाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम भजनी मंडळ काकनेवाडी यांनी केले आहे.