माका- महालक्ष्मी हिवरे- ते चांदा रस्त्यावरील खड्डेभरा अन्यथा आंदोलन!

दत्तात्रय शिंदे
माका -महालक्ष्मी हिवरे ते चांदा रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
नेवासा तालुक्यातील माका महालक्ष्मी हिवरे ते चांदा या रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे संतत च्या पावसामुळे रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून जागोजागी खड्डेच खड्डे झाले आहे खड्ड्या मुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे सदरील खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला आदेश देऊ नये खड्डे बुजवण्याचे काम सुरू न केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे
हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू न केल्यास माका महालक्ष्मी हिवरे चांदा या तीनही गावातील ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माका गावच्या उपसरपंच कमलाबाई मुरलीधर लोंढे ,महालक्ष्मी हिवरे गावच्या उपसरपंच चंद्रकला भगवान गंगावणे यांनी दिला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोहयो कार्यकारी अभियंता अहमदनगर या विभागाने ताराबाद राहुरी घोडेगाव कुकाना चांदा महालक्ष्मी हिवरे माका या राज्यमार्ग क्रमांक 66 च्या दुरुस्तीसाठी 3054 या निधीतून 46 लाख रुपये मंजूर केले आहे दिनांक 24 /०8/2022 रोजी कंत्राटदार बापूसाहेब नवले यांना काम सुरू करण्याचे आदेश दिले आहे परंतु अद्याप काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे