इतर

पत्रकारांनी लेखनी व्दारे समाजातील अन्यायाविरुद्ध वाचा फोडावी – तुळशीराम कळसकर सर

दत्ता ठुबे –

पारनेर प्रतिनिधी

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांनी आपल्या पत्रकारितेच्या लेखनीव्दारे लेखन करून समाजातील अन्याय , अत्याचार विरुद्ध सत्य लेखन करून दुर्लक्षित प्रश्नांना प्रकाशित आणून वाचा फोडण्याचे काम करावे , असे स्पष्ट प्रतिपादन पिंपळनेरकर सामाजिक प्रतिष्ठान चे सचिव तुळशिराम कळसकर सर यांनी केले आहे .
राज्यात सामाजिक , शैक्षणिक , कृषी , आर्थिक क्षेत्रात कार्यरत व अग्रेसर असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळनेर पिंपळनेरकर सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने नुकतेच पिंपळनेर येथे दि १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पत्रकारिता , शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीं चा सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ देऊन करण्यात आला . यावेळी पत्रकारिता क्षेत्रात आपल्या पत्रकारितेच्या लेखनी व्दारे समाजातील दुर्लक्षितील प्रश्नांवर सातत्याने लेखन करून त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पारनेर तालुक्यातील महिला पत्रकार , दैनिक पारनेर समर्थ च्या कार्यकारी संपादक , राज्य दैनिक बाळकडू च्या पारनेर तालुका प्रतिनिधी व एस ९ टिव्ही , मिडिया , चॅनलच्या पारनेर तालुका प्रतिनिधी सौ . निलम खोसे पाटील आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्या नगर जिल्हा सचिव , दैनिक पारनेर समर्थ चे संस्थापक , संपादक , दैनिक लोक आवाज चे पारनेर तालुका प्रतिनिधी सुरेश खोसे पाटील हे दाम्पत्य करत असल्याने त्यांना उत्कृष्ठ पत्रकार म्हणून सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ देऊन गौरविण्यात आले .
यावेळी सचिव कळसकर सर पुढे म्हणाले की , खोसे पाटील दाम्पत्य यांनी समाजातील विविध सामाजिक , शैक्षणिक , कृषी , राजकीय , धार्मिक , आर्थिक , या व इतर विषयांवरील समस्या , प्रश्नांवर उल्लेखनीय व अभ्यास पूर्ण लेखन करून पत्रकारिता क्षेत्राचा नावलौकिक उंचावला , अश्या या खोसे पाटील दाम्पत्याचा पुरस्कार प्रदान करून गौरव करणे , समाजाचे आदय कर्तव्यच आहे,असे ही गौरव पुर्ण उद्गार काढून सचिव तुळशिराम कळसकर सर यांनी काढून खोसे पाटील दाम्पत्याचा पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव पूर्ण उल्लेख केला .
या सन्मानाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्या नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील म्हणाले की , राज्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या पिंपळनेरकर सामाजिक प्रतिष्ठान आम्हा दाम्पत्याचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल जो गौरव पूर्ण उल्लेख करून आम्हांला उत्कृष्ट पत्रकार म्हणून जो पुरस्कार सम्मान पुर्वक प्रदान केला , त्याबद्दल प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी , ग्रामस्थ यांचे शतशः ऋणी तर आहोतच , पण या पुरस्काराने आमचीही जबाबदारी निश्चित वाढली आहे व आम्ही आमचा हा पत्रकारितेचा वसा असाच अखंड सुरू ठेवू , अशी ग्वाही ही पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांनी या प्रसंगी दिली . यावेळी पिंपळनेर मधील १० वी च्या परीक्षेत गुणवंत झालेले प्रज्ञा संजय रासकर , धनश्री ज्ञानदेव खामकर , श्रद्धा संतोष रासकर , गौरी राजेंद्र रासकर , आदित्य दत्तात्रय रासकर यांचा व सेवानिवृत्त सुभेदार संजय भाऊसाहेब गाजरे व इतरांचा ही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक तुकाराम वाखारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर चे सरपंच देवेंद्र लटांबळे,उपसरपंच छाया कळसकर,पिंपळनेरकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र गाजरे सर,माजी सरपंच सुभाष गाजरे पाटील,भाऊसाहेब लटांबळे,सेवा संस्थेचे चेअरमन विकास रासकर, संपतराव सावंत,सुरेश होले,प्रसिद्ध व्यापारी विजय गुगळे,राजू रासकर,मेजर संभाजी रासकर,चांगदेव शिर्के सर,वामन हजारे,प्रशांत लटांबळे,प्रा.सुरेश रासकर,सागर रासकर,बापूसाहेब लटांबळे,सुभेदार संजय सालके,सौ निर्मलाताई लटांबळे,विद्यालयाचे मुख्याध्यापक रामराव पवार,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंडलीक,सर्व शिक्षक,ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ मंडलीक यांनी केले तर सुत्रसंचालन विरेंद्र पवार सर,सचिव तुळशिराम कळसकर सर यांनी सुत्रबद्ध पद्धतीने केल्याने कार्यक्रम बहारदार झाला.शेवटी सौ संगिता पवार व सौ.पठारे या शिक्षिकांनी गोड असे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button