इतर
ठिय्या आंदोलनांनतर श्रीगोंदा तहसीलदारांकडून शिव पाणंद शेतरस्ते खुले करण्याचे आश्वासन

शेतकऱ्यांची फसवणुक केल्यास श्रीगोंदा तहसिलवर भव्य मोर्चा काढून जाब विचारणार- शरद पवळे
दत्ता ठुबे
श्रीगोंदा तहसिल कार्यालयामध्ये प्रलंबित शिवपानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर तहसीलदार क्षितीजा वाघमारे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्यातील शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांची विशेष बैठक पार पडली
शेतकऱ्यांचा दळवणाचा प्रश्न अत्यंत गंभीर होवून तालुक्यात शेतकऱ्यांना तहसिलवर हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी श्रीगोंदा शिवपानंद शेतरस्ता कृती समितीचे राजेंद्र नागवडे, दादासाहेब जंगले पाटील, ॲड. कडुस पाटील,जालिंदर कातोरे ,परेश वाबळे,सुनील गायकवाड,गुरू गायकवाड ,गोपाल कुलकर्णी यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते यावेळी शरद पवळे यांनी तहसिलदारांना शासन निर्णयाची अंमलबजावणी आपल्या कार्यालयाकडून होत नसल्याचे दाखवून देत हायकोर्टाच्या आदेशानुसार ६० दिवसांच्या आत शेतरस्ते खुले करून हद्द निश्चित करण्याच्या आदेशाचे पालन करत जिल्हाधिकारी कार्यालय कडून सप्तपदी अभियान महाराज स्वाभिमान राबविण्यात आले

परंतु याची तहसील कार्यालयाकडून दखल घेण्यात आली नाही होणारा वेळ काढून पणा आणि प्लंबित रस्त्या संदर्भात शेतकऱ्यांना न्याय मिळावा या संदर्भात तहसीलदारांना संमती विभागाचे अधिकाऱ्यांना बोलावण्याच्या सूचना शिवपाणी क्षेत्रात चळवळी करून करण्यात आल्या यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून या ठिकाणी शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश तहसीलदारांनी यावेळी दिले यावेळी भुमिअभिलेख कार्यालयाने कुठल्याही प्रकारची मोजणी फी आकारू नये व पोलीस प्रशासनाने संरक्षण शुल्क आकारू नये या संदर्भात तहसीलदारांनी सूचना केल्या व संबंधित विभागानेही त्या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासित केले व गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामशेतरस्ता समित्या स्थापन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या त्यावेळी त्यांनी ग्राम पंचायतींना ग्रामशेतरस्ता समित्या स्थापन करण्याच्या आदेश काढण्याचे सुचित केले व
