नेप्तीत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी !

नगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री चक्रधर स्वामी श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जयंती निमित्त पंडित परिवार व ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.
यावेळी सार्थक पंडित , मेघना पंडित ,कृष्णा पंडित, अक्षरा पंडित, कार्तिक खामकर, चैतन्य लोणारे ,अशोक लोणारे ,सुनील पंडित यांनी मंदिरात आकर्षक फुलाची सजावट करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. पहाटे 5 वाजता तपस्विनी पुजारी राधाबाई पंडित यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णची आरती करण्यात आली. स. 9 वाजता अनिल पंडित यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. स. 10 वाजता गीता पारायण झाले. स.11 वाजता दत्तात्रय कवच पठण झाले. दु.12 वाजता ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक आरतीचा कार्यक्रम झाला.

कार्यक्रम झाल्यानंतर परिसरातून आलेल्या भाविकांमध्ये खिचडी व केळाचे वाटप करण्यात आले. रात्री आठ वाजता नेप्ती येथील एकतारी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.यावेळी मंदिर परिसर भक्तीमय झाला होता .काही बालकांनी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषा केल्या होत्या रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला . सामूहिक विडा अवसर श्रीकृष्ण मूर्तीस अर्पण करण्यात आला.महिलांनी पाळणे गायले तसेच सर्वजणांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाचा जयघोष करीत भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले . भाविकांमध्ये सूटवडा व लह्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
