अखिल भारतीय विद्युत मजदूर संघाचे १७ वे त्रिवर्षीक अधिवेशन नाशिक येथे संपन्न होणार

महादर्पण वृत्तसेवा
भारतीय मजदूर संघ ह्या देशातील क्रमांक एक च्या केंद्रीय कामगार संघटनेला संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्युत कामगार महासंघाच्या सुवर्ण जयंती वर्षातील १७वे त्रिवार्षिक अधिवेशन दिनांक १४ व १५मे रोजी नासिक येथील पुणे विद्यार्थी वस्तीगृह संचालित देवधर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात संपन्न होत आहे २० राज्यातील प्रतिनिधी ह्या अधिवेशनात सहभागी होतील . कोविड प्रतिबंधासाठी शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचे पूर्णतः पालन करून हे अधिवेशन संपन्न होईल
ह्या ऐतिहासिक अधिवेशनाचे उदघाटन अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे संस्थापक सदस्य व भूतपूर्व अध्यक्ष के के हरदास यांच्या हस्ते होईल तर महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अनिल ढूमणे हे स्वागताध्यक्ष ह्या नात्याने देशभरातून आलेल्या प्रतिनिधींचेव पाहुण्यांचे स्वागत करतील
भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी सुरेंद्रन, राष्ट्रीय मंत्री रामनाथ गणेशे जी हे विशेष अतिथी व प्रमुख मार्गदर्शक आहेत भरतीय मजदूर संघाचे क्षेत्रिय संघटन मंत्री सी व्ही राजेश,उद्योग प्रभारी अख्तर हुसेन आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि विद्युत निगम प्रभारी एल पी कटकवार यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन सर्वांना लाभेल
हे दोन दिवसीय १७वे त्रिवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आर मुरलीकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल व श्री अमर सिंह सांखला हे संचालन करतील
विद्युत क्षेत्राला भेडसावणार्या समस्या,केंद्र व राज्य सरकारे घेत असलेले परस्परविरोधी निर्णय,कामगार व कामगार संघटना विरोधी पारित झालेले कायदे शासकीय विद्युत क्षेत्राचा होत असलेला संकोच आदी विषयांवर ह्या अधिवेशनात सखोल चर्चा होऊन आगामी रणनिती निश्चित्त केली जाईल.विद्युत क्षत्रापुढे येणाऱ्या आव्हानांचा तितक्याच खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी संपुर्ण जबाबदरी युवा नेतृत्वाकडे सोपवली जाईल, महत्वपूर्ण प्रस्ताव पारित होतील
सुवर्ण जयंती वर्षात संपन्न होणाऱ्या हे अधिवेशन घेण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली आहे व या संधीचे सोने करणयाचा निर्धार वीज कामगार महासंघा ने केला असून अधिवेशन संयोजनाची संपूर्ण जबाबदारी नाशिक व नगर येथील कार्यकर्त्यांवर सोपवली आहे व त्यानुसार कार्यकर्ते कामाला लागले आहेत अशी माहिती वीज कामगार महासंघाचे जिल्हा सचिव गणेश कुंभारे यांनी दिली.