नाशिक येथे रोटरी मिन्स बिजनेस ची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स संपन्न

नाशिक दि १
नाशिक येथे रोटरी मिन्स बिजनेस ची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स संपन्न उत्साहात संपन्न झाली आरएमबी नाशिक क्लब चे अध्यक्ष रोटे.अमित पगारे व आरएमबी जळगाव चे रोटे. प्रसन्न जैन हे समन्वयक तर आर एम बी चे सह संस्थापक तथा मार्गदर्शक डिस्ट्रिक्ट चेअरमन रोटे. डॉ.गौरव सामनेरकर व आर एम बी जळगाव चे रोटे.दिपककुमार पाटील यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आरएमबी चे आंतरराष्ट्रीय संचालक रोटे.महेश सप्तर्षी, रोटरी डिस्ट्रिक्ट चे प्रांतपाल रोटे. राजींदर सिंग खुराणा व स्पेक्ट्रम इलेक्ट्रिक जळगाव चे व्यवस्थापकीय संचालक श्री दिपक चौधरी, इन्फिनिटी फ्रेंच डोअर्स चे आशिष सिनकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रोटे.ऍड.राजेश्वरी बालाजीवाले यांनी केले व डिस्ट्रिक्ट चेयरमन डॉ. गौरव सामनेरकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली…
मैत्रीपूर्ण संबंधातून व्यवसाय वृद्धी करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत रोटरी मीन्स बिजनेस (आरएमबी) डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स हॉटेल सयाजी येथे ३१ ऑगस्ट ला आयोजित केली होती. मुंबई,पुणे,नाशिक ,जळगाव,नागपूर,मालेगाव, ठाणे येथील विविध रोटरी व्यावसायिक व उद्योजक या कॉन्फरन्स ला उपस्तिथ होते.मैत्री, विश्वास आणि पारदर्शकता हि आरएमबी सभासदांच्या यशस्वी व्यवसायाची त्रिसूत्री आहे.कोणतेही रोटेरियन सभासद हे आरएमबी क्लबचे सभासद होऊ शकतात. रोटरी सभासदांमध्ये जास्तीत जास्त व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे, उद्योग विकासाला चालना देणे यासाठी आरएमबी क्लब प्रयत्नशील असतो. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये पाच आरएमबी क्लब असून, कार्यक्रमास आरएमबी नाशिक, जळगाव, नागपूर, पुणे, ठाणे व मालेगाव चे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
कॉन्फरन्स चे मुख्य आकर्षण हे व्यावसायिक चर्चासत्र सर्व सहभागी व्यवसायिक यांना प्रेजेंटेशन,वैयक्तिक व्यवसाय मार्गदर्शन, शंका समाधान हे ठरले. नेटवर्किंग च्या माध्यमातून आपण एक हजार कोटी ची उलाढाल स्पेक्ट्रम इलेक्ट्रिक ने केल्याचे प्रतिपादन व्यवस्थापकीय संचालक दिपक चौधरी यांनी केले.
सुरु केलेला इन्फिनिटी फ्रेंच डोअर्स उद्योग आज दहा जिल्ह्यात पसरला असून १५० कुटुंबीयना रोजगार उपलब्ध करण्यात यशस्वी झाल्याचा आनंद हि आपल्या उद्योगाच्या विस्तारासाठी प्रेरणा असल्याचे आशिष सिनकर यांनी सांगितले.

रोटे.दिपक कोतकर ह्यानी सर्व सहभागी उद्योजकांच्या वतीने कॉन्फरन्स च्या माध्यमातून व्यवसायवृद्धी साठी सुवर्णसंधी लाभल्याची भावना व्यक्त केली.