काकनेवाडी येथे केशर आंबा वृक्ष वाटप

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील काकनेवाडी येथील आदर्श शिक्षक विजय गेनू वाळुंज आणि ग्रा. सदस्या संगीता विजय वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली कु.अभिनव विजय वाळुंज यांच्या संकल्पनेतून काकनेवाडी मध्ये केशर आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत निवडणुकीत या परिवाराने दरवर्षी वेगवेगळ्या समाजहिताच्या योजना जाहीर केल्या होत्या. कन्यादान योजना, शिष्यवृत्ती योजना तसेच पाच वर्षात पाच वृक्षाचे रोप वाटप अशा संकल्पना होत्या.
यातील बऱ्याच योजना या कुटुंबाच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे जात आहेत.
शनिवारी जवळपास 125 आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी काकनेवाडीचे लोकनियुक्त सरपंच अशोक पा वाळुंज, उपसरपंच पारुबाई रभाजी वाळुंज, ग्रा सदस्य संभाजी पो. वाळुंज,वृषाली वाळुंज, नवनाथ वाळुंज व संगीता वाळुंज तसेच शम्भूराजे मित्र मंडळाचे सदस्य अर्जुन वाळुंज, अशोक पं. वाळुंज,शिक्षक अशोक वाळुंज,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाळुंज, राहुल वाळुंज, अनिल वाळुंज तसेच शंभूराजे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष हभप. रंगनाथ महाराज वाळुंज उपस्थित होते. पुढील वर्षी नारळाच्या झाडांचे वाटप करणार असल्याचे इंजि.अभिनव वाळुंज यांनी सांगितले.