नेवासा गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलांचा हार…आरोपीची निर्दोष मुक्तता

नेवासा प्रतिनिधी।
तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण माध्यमातून करण्यात आलेल्या तब्बल सव्वा कोटीच्या बेकायदेशीर कामाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात आला
मौजे भेंडे बुद्रुक येथील भ्रष्टाचारातील आरोप सिद्ध होऊन आपल्या नोकरीवर गदा येऊ नये, फौजदारी गुन्हे दाखल होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर दिनांक १६/०६/२०२३ रोजी कायद्याचा दुरुपयोग करून मालमत्तेचे विद्रुपीकरण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता .सदर खोटा गुन्हातून सर्व आरोपींची नेवासा न्यायालयातील न्या. श्रीमती पी आर सुगावकर यांनी निर्दोष मुक्तता केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे भेंडे बुद्रुक ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या दीड कोटी रुपयांच्या बेकायदेशीर कामाची चौकशी करून ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यासाठी जीवन ज्योत फाऊंडेशन तर्फे तक्रार दाखल करण्यात आली होती.
भेंडे बुद्रुक ग्रामपंचायत चे बेकायदेशीर कामामधून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आल्याने दिनांक 9 जून 2023 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांचे खुर्चीला चपलांचा हार घालून आंदोलन करण्यात आले. गट विकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांचे खुर्चीला चपलांचा हार घातल्याने जीवन ज्योत फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष कमलेश बाबासाहेब नवले,भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नेवासा तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश बाबासाहेब तागड आणि स्वप्निल ज्ञानदेव गरड यांच्यावर शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेवासा न्यायालयात सदर गुन्ह्यात आरोपींच्या वतीने ऍड. गणेश निकम, ऍड.माधव काळे आणि ऍड. शेखर गोर्डे यांनी कामकाज पाहिले तर सरकार पक्षातर्फे ऍड. सागर चव्हाण यांनी कामकाज पाहिले.सदर गुन्ह्यात जीवन ज्योत फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष कमलेश बाबासाहेब नवले, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नेवासा तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश बाबासाहेब तागड आणि स्वप्निल ज्ञानदेव गरड यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
राजकीय आकसापोटी शासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरून स्थानिक गाव पुढाऱ्यांनी बळजबरीने खोटा गुन्हा दाखल करण्यास हातभार लावला परंतु शेवटी सत्याचा विजय झाला आहे. त्या दीड कोटी रुपयांच्या बोगस कामांचा भ्रष्टाचार बाहेर काढून दोषींना कारवाईला सामोरे जाई पर्यंत स्वस्थ बसणार नाही.
-कमलेश नवले पाटील.
जीवन ज्योत फाऊंडेशनमंत्रालय स्तरावर सदर भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई चंद्रशेखर घुले आणि इतर दोषींना शिक्षा होई पर्यंत माघार घेणार नाही तसेच सर्व बोगस कामांचा निधी संबंधितांकडून वसूल करणारच
-ऋषिकेश बाबासाहेब तागड.
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष.