इतर

डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्याची राष्ट्रपतींशी ग्रेटभेट…!


अकोले प्रतिनिधी

राष्ट्रपती भवनाचे आकर्षण कोणाला नाही..दुर्गम आदिवासी भागातील डोंगराळ अन जंगलातील काट्याकुट्यातुन वाट काढत शाळेचा रस्ता धरणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रपतींची ‘थेटभेट’ ही जणु पर्वणीच होती, अशी पर्वणी महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी घडवून आणली आहे.’

अप्पर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दैनिक पुढारी तर्फ “पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा” आयोजित करण्यात आली होती.या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील एकुण चोवीस हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.सदर चोवीस हजार विद्यार्थ्यांतुन यशस्वी झालेल्या निवडक चोवीस विद्यार्थ्यांना मा. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म भारत सरकार, दिल्ली यांच्याशी ९ डिसेंबर २०२४ रोजी या निवडक विद्यार्थ्यांची भेट झाली आहे. या चोवीस विद्यार्थ्यात राजुर प्रकल्पातील चार विद्यार्थ्यांची निवड झाली होती.

यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जवळेबाळेश्वर ता.संगमनेर जि.अहिल्यानगर या शाळेतील ऋतेज विलास डामसे इयत्ता -नववी, विक्रम कांतीलाल पिचड पिंपरकणे,ऊमेश विश्वनाथ वायाळ केळीकोतुळ, ऋषीकेश पांडुरंग भांगरे आदर्श आश्रम शाळा मवेशी या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. देशाच्या राष्ट्रपतींना भेटण्याची सुवर्णसंधी मिळाल्यामुळे “आकाशा पुढती जेथे गगन ठेंगणे”. असा या मुलांना आनंद झाला होता.
दि. सात ते अकरा डिसेंबर अखेर संपन्न झालेल्या राष्ट्रपती भेटीच्या सहलीत, केंद्रीय रस्ते व वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांचीही मुलांशी भेट झाली. सदर सहलीत मुलांनी दिल्लीतील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. जातांना रेल्वेने प्रवास तर येतांना दिल्ली ते नाशिक विमानप्रवासाचा अंदभुत अनुभव मुलांनी घेतला.निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे राजुर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, सहा. प्रकल्प अधिकारी मनोज पैठणकर, दिपक कालेकर,यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुरच्या वतीने विशेष अभिनंदन केले आहे.


जवळेबाळेश्वर येथील विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री.आदिनाथ सुतार सर, वर्ग शिक्षक श्री देविदास रणमळे सर, अधिक्षक दिपक गुंडेकर, अधीक्षिका सुरेखा नाईकवाडी मॅडम, शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व विद्यार्थी यांनी मुलाचे शाळेत परत आल्यानंतर बुधवारी जोरदार स्वागत करत अभिनंदन केले.
जवळेबाळेश्वरचे सरपंच बंटी पांडे, उपसरपंच अतुल कौटे,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल डामसे, उपाध्यक्ष सुनिताताई करवंदे,जवळेबाळेश्वरचे उपसरपंच अतुल कौटे,सोमनाथ करवंदे,पांडुरंग कौटे,रामदास भांगले,भाऊसाहेब कौटे,बन्सी चिखले, बाळु कौटे,शिंगाडे सर, यांनी अभिनंदन केले आहे.तसेच यशस्वी विद्यार्थांना शाळेचे शिक्षक श्रीनिवास सुर्यवंशी,श्रीगणेश पवार,
सुरेखा गायकवाड, नितीन पायके,दिलीप धांडोरे,संजय सुपे,संतोष गायकर, अश्विनी शिंदे,कल्पना सुकटे, गणेश खतोडे,विजय लोहार, या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले होते,यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा परीसरात सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button