राजापूर च्या नूतन कला महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

राजापूर – 5 सप्टेंबर 2024 रोजी नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कला व सांस्कृतिक विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळातर्फे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली तर सुयोग वर्पे, स्नेहा घोलप व योगेश फटांगरे यांनी प्राचार्यांची भूमिका पार पाडली. विद्यार्थी शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करताना आलेले अनुभव आपल्या मनोगतात व्यक्त केले. प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल, क्लार्क, शिपाई या विविध भूमिका पार पाडताना प्रत्यक्ष आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
शिक्षक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व सहभागी विद्यार्थी शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे नियोजन कला व संस्कृतीक विभाग प्रमुख प्राध्यापिका शितल देशमुख व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.प्रवीण आहेर यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कडलग यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.