
अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील फक्त ४०० उंबरा असलेल्या बोरकिनी गावाने भगवान गडासाठी चक्क ९३ लाखाची देणगी दिली
या बोरकिनी गावाने देणगी देण्याचे रेकॉर्ड तोडले असुन भगवान गडाच्या विकासासाठी ९३ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. महंत डॉ.न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री बोरकिनी येथे काल्याचे किर्तना साठी गेले होते या कार्यक्रमामध्ये बोरकिनी ग्रामस्थांनी हि ९३ लाखाची देणगी देण्याचे जाहीर केले .
आतापर्यंतच्या भगवान गडाच्या विकासासाठी देणगी देणाऱ्या गावामध्ये बोरकिनी हे गाव सगळ्यात जास्त देणगी देणारे गाव ठरले ९३ लाख इतका आकडा असुन ते टप्प्या टप्प्याने हि रक्कम भगवान गडाला सुपुर्द करण्यात येईल असे यावेळी येथील ग्रामस्थांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातुन भगवान गडाच्या विकास कामासाठी देणगी येत असल्याने भगवान गडाचा विकास हा झपाट्याने होत आहे गेली २ वर्ष कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात या महामारीने आर्थिक चक्र कोलमडून गेले आहे २ वर्ष मंदिरे पुर्ण पणे बंद राहिल्याने त्याचा परिणाम आर्थिक व्यवहारावर होऊन भरपूर ठिकाणी मंदिरे, विविध गडांची , धार्मिक स्थळे या ठिकाणची कामे ठप्प झाली असून ती पुर्व पदावर येण्यासाठी वेळ जाईल बोरकिनी ग्रामस्थांनी ९३ लाखाची देणगी भगवानगडा साठी देऊन संपूर्ण महाराष्ट्राच रेकॉर्ड तोडले आहे असे यावेळी डॉ न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले.