अहमदनगर: नगर तालुक्यातील नेप्ती परिसरात १० सार्वजनिक तरुण मंडळाकडून गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे गाव नेहमीच जातीय सलोखा जपत आहे. गावात कुठलेही धार्मिक सण, उत्सव किंवा ईद असो हिंदू मुस्लिम नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात. लोक एकत्र येऊन गुण्या गोविंदाने उत्सव साजरा करतात. गावातील दोस्ती तरुण मंडळ व नाले हैदर यंग पार्टीच्या गणेश मूर्ती स्थापना मुस्लिम नागरिक जमीर सय्यद यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत होते .दोस्ती तरुण मंडळाचे ४४ वे वर्ष आहे. गेल्या ४४ वर्षापासून हिंदू मुस्लिम युवक एकत्र येऊन दरवर्षी गणपती प्राणप्रतिष्ठा तकिया जवळ करतात . दहा दिवस या ठिकाणी मोठ्या भक्तीमय वातावरणात हिंदू मुस्लिम बांधव गणेशाची पूजा करतात आणि त्यानंतर मोठ्या जल्लोषात विसर्जन करतात. मनात भावना शुद्ध असतील तर ईश्वर अल्लाह हे एकच आहेत. या गावात हिंदूंच्या सणात मुस्लिम तर मुस्लिमांच्या सणात हिंदू एकमेकांना सहकार्य करतात . अनेक मुस्लिम तरुणांच्या गणपती आरती तोंड पाठ आहे. तसेच विसर्जन मिरवणुकी अनेक मुस्लिम मोठ्या प्रमाणात भाग घेतात ही जुनी प्रथा आहे याच प्रमुखांना मुळे गावचे इतिहासात हिंदू मुस्लिम समाजात शांततेला आतापर्यंत गालबोट लागले नाही. गावात गणपतीचे आगमन झाल्याने वातावरण प्रफुल्लित झाले आहे. नमाज पडला जातो आणि नमाज समताच गणेशाची आरती केली जाते .शहरात गणेश चतुर्थी व ईद सणासाठी मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो त्याचवेळी नेप्ती गावातील धार्मिक ऐक्य सर्वांसाठी आदेशवंत ठरते . यावेळी दोस्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष वसंत पवार, देवा होले, उपसरपंच दादू चौगुले, फारुख सय्यद, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले, पोलीस पाटील अरुण होले प्रा. एकनाथ होले ,जावेद सय्यद, भूषण पवार, मुक्तार सय्यद,संतोष चहाळ, कुमार जपकर ,सलीम सय्यद, परवेज सय्यद, नितीन पवार ,रफिक सय्यद, राहुल गवारे, बाबु होळकर, पुरोहित अमोल औटी, रमिज सय्यद, राहुल चौगुले, गोपीनाथ होले, वासीम सय्यद, दोस्ती तरुण मंडळ व नाले हैदर यंग पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.