अकोले तहसिल कार्यालयात २५ एप्रिल ला ग्राहक दिनाचे आयोजन

अकोले /प्रतिनिधी
ग्राहक दिनानिमित्त अकोल्यातील तहसील कार्यालयात मंगळवार २५ एप्रिल दुपारी १२.०० वा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी दिली.
या मेळाव्यात ग्राहकांच्या विविध क्षेत्रातील तक्रारींचे निवारण करण्यात ग्राहक पंचायत अकोले पुढाकार घेणार असून संबंधित अधिकारी व ग्राहक यांच्यासमोर समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे ग्राहक पंचायतचे अध्यक्ष दत्ता शेणकर , जिल्हा सहसचिव रमेश राक्षे, कार्याध्यक्ष महेश नवले यांनी स्पष्ट केले.
मच्छिंद्र मंडलिक म्हणाले ग्राहक दिनात यापूर्वी अनेक ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न ग्राहक पंचायतीच्या वतीने केला गेलेला आहे.
अकोले हा आदिवासी तालुका आहे. तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहे. अनेक शासकीय विविध दाखले, रेशन पुरवठा, वीज पुरवठा, शहरी व ग्रामीण भागात गॅस पुरवठा, बी- बियाणे, औषधी, कृषी खते, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती , आदिवासी आश्रम शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण व इतर सुविधा मिळत नाही, सिटी सवे॔ कार्यालय, दुयम्म निबंधक कार्यालय, दलालबाजी, आधारसेतू कार्यालय, वन खाते, पशू संवर्धन, पंचायत समिती, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, राजूर प्रकल्प कार्यालय, जीवन प्राधिकरण कार्यालय , ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक, सार्वजनिक बांधकाम, बालविकास प्रकल्प, मार्केट कमिटी, वजन मापे, बँक व अनेक दैनंदिन कामातील अडचणींची सोडवणूक या वेळी करण्यात येणार आहे. अधिकारी व ग्राहक यांच्यासमोर ही सोडवणूक केली जात असल्याने ग्राहकांनी आपल्या तक्रारी तोंडी, लेखी व पुराव्यानिशी मांडाव्या व मेळाव्यास उपस्थित राहावे असे आव्हानही त्यांनी केले आहे.
तसेच तहसीलदार सतीश थेटे , नायब तहसीलदार टी.डब्लु. महाले, महसुलचे नायब तहसीलदार उबाळे, पुरवठा निरीक्षक रसिक सातपुते, पुरवठा लिपिक दत्तात्रय कोल्हाळ, ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेनकर , रमेश राक्षे, महेश नवले, प्रा. डॉ सुनिल शिंदे, सिताराम भांगरे, अँड राम भांगरे, अँड दिपक शेटे, प्रमोद मंडलिक आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.
ग्राहकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आव्हान माधवराव तिटमे, रामहरी तिकांडे, रामदास पवार, भाऊसाहेब गोर्डे, राजेंद्र घायवट, गंगाराम धिंदळे, डॉ अनंत घाने, भाऊसाहेब वाळुंज, राम रुद्रे, ज्ञानेश पुंडे, प्रा. रामनाथ काकड, सखाराम खतोडे, सुनिल देशमुख ,शारदा शिंगाडे, शोभा दातखिळे , मंगल मालुंजकर, प्रतिभा सुर्यवंशी, बाळासाहेब बनकर, दत्ता ताजणे, शुभम खर्डे, सकाहारी पांडे, धनंजय संत, भाऊसाहेब वाकचौरे, मंदा साळुंके, सुदाम मंडलिक, संजय वाकचौरे, कैलास तळेकर, मच्छिंद्र चौधरी, नरेंद्र देशमुख , जालिंदर बोडके आदिंनी केले आहे.