आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१३/०९/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद २२ शके १९४६
दिनांक :- १३/०९/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३२,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २२:३९,
नक्षत्र :- पूर्वाषाढा समाप्ति २१:३६,
योग :- सौभाग्य समाप्ति २०:४८,
करण :- तैतिल समाप्ति ११:०८,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पूर्वा,(९:३५नं. उत्तरा),
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५३ ते १२:२५ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:५३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२५ ते ०१:५७ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
उत्तरा रवि ९:३५, वाहन हत्ती, स्त्री.पु.सू.चं.,
————–
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद २२ शके १९४६
दिनांक = १३/०९/२०२४
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
जुनी रखडलेली कामे सामोरी येतील. मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्र गरजेच्या वेळी धावून येतील. हास्य विनोदात दिवसाचा उत्तरार्ध जाईल.
वृषभ
विद्यार्थ्यानी आळस झटकून टाकावा. घरातील कामांमध्ये गुंग व्हाल. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. दिनक्रम व्यस्त राहील. गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल.
मिथुन
हस्तकलेला वाव द्यावा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बौद्धिक कस लागू शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. कामातील तांत्रिक बदलांकडे लक्ष ठेवा.
कर्क
लोकांना नवे ठेवायला जागा देऊ नका. आपण आपले काम करीत राहा. आवडी निवडी बाबत आग्रही राहाल. नवीन ओळखी होतील. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका.
सिंह
कोणत्याही निर्णयात संभ्रम आड आणू नका. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. विचार करूनच निर्णय घ्या. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जुगारात लाभ होऊ शकतो.
कन्या
घरासाठी नवीन खरेदी कराल. स्वप्नातून जागे व्हा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. तडजोडीला पर्याय नाही. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.
तूळ
मधाळ बोलून लोकांना आकर्षित कराल. उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. दिवस आळसात जाऊ शकतो. शारीरिक ताण जाणवेल. अतिरिक्त बोलणे टाळावे.
वृश्चिक
जुन्या गैरसमजुती मनातून काढून टाका. आशावादी दृष्टिकोन कायम ठेवा. साहस करताना सतर्क राहा. नवीन शिकण्याची संधी सोडू नका. प्रेमातील व्यक्तींनी संयम बाळगावा.
धनू
सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. धार्मिक गोष्टीत दिवस व्यतीत कराल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यवसायात प्रगती करता येईल. तरुण वर्गाकडून नवीन गोष्टी शिकाल.
मकर
आपल्यामुळे इतरांची गैरसोय टाळा. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. मुलांची कृती आनंद दायक असेल.
कुंभ
अती अपेक्षा बाळगू नका. मानसिक समतोल साधावा. बोलताना भान राखावे. आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत. कौटुंबिक शांतता महत्त्वाची.
मीन
व्यायामाचा कंटाळा करू नका. आहारावर नियंत्रण ठेवा. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल. हाता-पायांची काळजी घ्यावी. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर