इतर

वाजतगाजत साजरी केली आईची नव्वदी !गावातुन रथातून मिरवणूक, आणि स्नेहभोजन

कान्हुर पठार मधील मुजावर कुटुंबाचा आदर्शवत उपक्रम

पारनेर प्रतिनिधी :
मुलांना कष्टातुन शिकवल आज, त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी प्रगती साधली यापेक्षा आईला आनंद वाटणारी वेगळी गोष्ट नाही मात्र मुलांनी त्यापुढे जात ज्या आईनी आपल्याला मोठ केल तिचे ऋण कधीही न फिटणारे आहेत मात्र तीचा ९० वा वाढदिवस ढोल ताशांच्या समवेत वाजतगाजत साजरा करत गावाला स्नेहभोजन देत गावातुन आईची रथावर मिरवणूक देखील काढली.
कान्हूर पठार
(ता.पारनेर) येथील रहीवाशी मात्र व्यवसाय निमित्त नाशिक येथे स्थायिक आसणारे व सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे मुजावर कुटुंबाने आईचा ९० वा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करत समाजात वेगळा संदेश दिला आहे.आजकाल एकत्रित कुटुंब पध्दत लोप पावत चालली असल्यामुळे वृध्दाश्रम संख्येत वाढ होत चालली आहे. मात्र यात अजुनही कुटुंब एकत्रित राहत आहेत. मुजावर कुटुंबातील सदस्य अब्बास मुजावर, हाजी मुजावर, हसन मुजावर, कासम मुजावर व रबिया मुजावर ही सर्व मुले उद्योग व्यवसायात नाशिक जिल्ह्यात अग्रेसर आहेत. आपल्या आईचा जिन्नत हाजी मुजावर यांचा ९० वा वाढदिवस गावात साजरा करण्याचे ठरविले. गावामध्ये बँड पथक, घोड्यावरील रथावर आईला बसवुन वाजतगाजत गावातुन मिरवणूक काढली गावकऱ्यांनी देखील आईंचा आदर सत्कार करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.गावकऱ्यांसाठी मुजावर कुटुंबाने स्नेहभोजनाचे देखील आयोजन केले होते. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे गावकऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले.
यावेळी सरपंच संध्या ठुबे, गोकुळ काकडे, सागर व्यवहारे, शिवाजी व्यवहारे, सुधीर लोंढे, दत्तात्रय ठुबे, विजयकुमार ठुबे, कांतीलाल साळवे, डी.आर.ठुबे, कैलास लोंढे, नियाज इनामदार, एकनाथ ठुबे, गुलाब लोंढे, एस. एल. ठुबे, बाळासाहेब ठुबे, सुनिता वाळके, ज्ञानेश्वर ठुबे, सद्दाम इनामदार, भानुदास ठुबे, उपस्थित होते.

एखाद्या स्त्री ची कितीही बिकट परिस्थिती असेल मात्र तिने कष्ट करुन आपल्या मुलांना शिक्षण देत आपल्या पायावर उभे केले असे आमच्या आईचे व्यक्तिमत्व आहे.
हे इतरांना प्रेरणादायी ठरावे त्याकरीता हा कार्यक्रम आयोजित केला.तिचे ऋण कधीही न फिटणारे आहेत.

; गावातुन रथातून मिरवणूक, स्नेहभोजन कान्हुर पठार मधील मुजावर कुटुंबाचा आदर्शवत उपक्रम पारनेर प्रतिनिधी : मुलांना कष्टातुन शिकवल आज, त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी प्रगती साधली यापेक्षा आईला आनंद वाटणारी वेगळी गोष्ट नाही मात्र मुलांनी त्यापुढे जात ज्या आईनी आपल्याला मोठ केल तिचे ऋण कधीही न फिटणारे आहेत मात्र तीचा ९० वा वाढदिवस ढोल ताशांच्या समवेत वाजतगाजत साजरा करत गावाला स्नेहभोजन देत गावातुन आईची रथावर मिरवणूक देखील काढली.कान्हूर पठार (ता.पारनेर) येथील रहीवाशी मात्र व्यवसाय निमित्त नाशिक येथे स्थायिक आसणारे व सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे मुजावर कुटुंबाने आईचा ९० वा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करत समाजात वेगळा संदेश दिला आहे.आजकाल एकत्रित कुटुंब पध्दत लोप पावत चालली असल्यामुळे वृध्दाश्रम संख्येत वाढ होत चालली आहे. मात्र यात अजुनही कुटुंब एकत्रित राहत आहेत. मुजावर कुटुंबातील सदस्य अब्बास मुजावर, हाजी मुजावर, हसन मुजावर, कासम मुजावर व रबिया मुजावर ही सर्व मुले उद्योग व्यवसायात नाशिक जिल्ह्यात अग्रेसर आहेत. आपल्या आईचा जिन्नत हाजी मुजावर यांचा ९० वा वाढदिवस गावात साजरा करण्याचे ठरविले. गावामध्ये बँड पथक, घोड्यावरील रथावर आईला बसवुन वाजतगाजत गावातुन मिरवणूक काढली गावकऱ्यांनी देखील आईंचा आदर सत्कार करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.गावकऱ्यांसाठी मुजावर कुटुंबाने स्नेहभोजनाचे देखील आयोजन केले होते. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे गावकऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले.यावेळी सरपंच संध्या ठुबे, गोकुळ काकडे, सागर व्यवहारे, शिवाजी व्यवहारे, सुधीर लोंढे, दत्तात्रय ठुबे, विजयकुमार ठुबे, कांतीलाल साळवे, डी.आर.ठुबे, कैलास लोंढे, नियाज इनामदार, एकनाथ ठुबे, गुलाब लोंढे, एस. एल. ठुबे, बाळासाहेब ठुबे, सुनिता वाळके, ज्ञानेश्वर ठुबे, सद्दाम इनामदार, भानुदास ठुबे, उपस्थित होते.

: एखाद्या स्त्री ची कितीही बिकट परिस्थिती असेल मात्र तिने कष्ट करुन आपल्या मुलांना शिक्षण देत आपल्या पायावर उभे केले असे आमच्या आईचे व्यक्तिमत्व आहे.हे इतरांना प्रेरणादायी ठरावे त्याकरीता हा कार्यक्रम आयोजित केला.तिचे ऋण कधीही न फिटणारे आहेत.

अब्बास मुजावर, उद्योजक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button