पारनेर शहरातील व्यावसायीकांवर बेकारीची कुऱ्हाड.बाहेरील उद्योजकांना राणीताई लंके ची मदत.

दत्ता ठुबे
पारनेर दि.१२
पारनेर शहरातील खासदार डॉ निलेश लंके यांचे संपर्क कार्यालय समोर जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राणीताई निलेश लंके यांच्या माध्यमातुन ५० टक्के सवलतीच्या दरात स्मार्ट अँड्रॉइड एल ई डी, टिव्ही, रेंजेर सायकल, पाण्याचा फिल्टर सवलतीच्या दरात असलेला कॅम्प लावण्यात आलेला आहे. हा कॅम्प बाहेरील व्यावसायिकांनी लावलेला असल्याने स्थानिक व्यावसायिकावर उपासमार करण्याची वेळ आलेली आहे. या बाहेरील व्यावसायिक मुळे शहरातील स्थानिक व्यावसायिकावर अन्याय होत असल्याने शहरातील व्यावसायिक संताप व्यक्त करत आहेत.
पारनेर तालुका हा दुष्काळी असल्याने येथील व्यवसाय जेमतेमच आहे. पारनेर शहरात काही तरूण व्यावसायिकांनी इलेक्ट्रॉनिक उद्दोग उभारले आहेत . या उद्योगांसाठी शेत गहाण ठेऊन बँकाचे कर्ज काढून लहान मोठे व्यवसाय उभारले आहे. आधीच शहरातील उद्योग जेमतेमच चालत आहे. त्या मुळे बहुतांश व्यावसायिकाना कर्ज फेडता फेडता नाकीनऊ आलेले आहे. आत्महत्या करावी काय अशी परिस्थिती शहरातील व्यावसायिकांची झालेली आहे. त्यातच खासदार डॉ निलेश लंके यांचे संपर्क कार्यालय समोर जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य राणी ताई लंके यांच्या माध्यमातुन ग्राहकांना ५० टक्के सवलतीच्या दरात एल ई डी टिव्ही, रेंजर सायकल, पाण्याचा फिल्टर या वस्तूचा कॅम्प लावण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हा कॅम्प व्यावसायिक बाहेरील जिल्हयातील आहेत. या मुळे स्थानिक व्यावसायिकां परीणाम होत आहे. शहरातील व्यावसायिक यांच्याकडे हि या सर्व वस्तू आहेत. पण या बाहेरील जिल्ह्यातील व्यावसायिकांनी कॅम्प लावल्याने स्थानिक व्यवसायिक कमालीचे नाराज झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य राणी ताई लंके यांनी स्थानिक व्यावसायिकांचा सकारात्मक विचार करून बाहेरील उद्योजकांना वगळून शहरातील उदोजक यांना मदत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पारनेर तालुक्यातील स्थानिक होतकरू उद्योजकाना कॅम्प लावण्यासाठी मदत करायला हवी होती. आधीच पारनेर शहरातील उद्दोग आजारी पडत चालले आहेत.बाहेरील उद्योजकांना प्रोत्साहन देणे चुकीचे आहे.
अशोक चेडेअध्यक्ष, पारनेर तालुका व्यापारी संघटना.
पारनेर शहरात असेच ५० टक्के सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक वस्तूचे कॅम्प चालले तर स्थानिक व्यवसायिक रस्त्यावर येतील.
मनोज गांधी
इलेक्ट्रॉनिक उद्योजक.जबाबदार व्यक्ती कडून पारनेर ची बाजार पेठ उध्वस्त करण्याचा डाव
.भाऊसाहेब खेडेकर
सामजिक कार्यकर्ते.