नवभारत कन्या निवास मध्ये सामाजिक न्याय पर्व

संगमनेर -अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संचालित नवभारत कन्या निवास सारोळे पठार या वसतिगृहात सामाज कल्याण आयुक्तालय यांच्यामार्फत सामाजिक न्याय पर्व आयोजित करण्यात आले
समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत सामाजिक न्याय पर्व दिनांक 1 मार्च 2023 ते 1 मे 2023 या कालावधीत विविध उपक्रम राबविण्याचे ठरले आहे. याच उपक्रमांतर्गत नवभारत कन्या निवास वसतिगृह सारोळे पठारच्या अधीक्षिका सुनिता नवथर यांनी वसतिगृहत सामाजिक न्याय पर्वामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर आधारित वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयीची कार्यशाळा आयोजित करणे, महात्मा फुले यांची जयंती साजरी करणे असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत निकिता मोरे, योगिता चौधरी, अश्विनी धुळे, नीलम पाटील, प्रतीक्षा गभाले या विद्यार्थिनींनी निबंध स्पर्धेत यश संपादन केले.या यावेळी नवभारत कन्या निवासाच्या अधिक्षिका सुनीता नवथर ,योगिता शिरसाट, रेश्मा राहणे, कलाबाई फटांगरे, शमीना मोमीन, सिंधुबाई फटांगरे, नानासाहेब कदम, मंगेश औटी आदी उपस्थित होते.
