जयहिंदच्या क्रिकेट स्पर्धेत महिलांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद

संगमनेर प्रतिनिधी
जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने सुरू असलेल्या सहकार महर्षी टी-20 क्रिकेट स्पर्धेत संगमनेर मधील जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशन, डॉ असोसिएशन, राजमाता जिजाऊ, यांसह विविध महिला संघटनांमधील महिलांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात 12 जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त महिलांनी क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला यावेळी संयुक्त जयंती साजरी केली.याचबरोबर राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर माता रमाई फातिमा बिवी या सर्वांना अभिवादन ही करण्यात आले.
यानंतर महिलांच्या चार षटकांच्या क्रिकेट स्पर्धा झाल्या. क्रिकेटचा पोशाख परिधान करून सर्व महिलांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला .यावेळी फलंदाजी आणि गोलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षणाचाही महिलांनी आनंद घेतला.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, शहराच्या मा. नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह संगमनेर मधील विविध महिला संघटनांच्या पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना सौ दुर्गाताई तांबे म्हणाले की, या महान विभूतीमुळे महिलांना स्वातंत्र्य मिळाले आहे.. त्यामुळे आज महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये कायमच महिलांचा सन्मान केला जात आहे. महिलांमध्ये अनेक कौशल्य असून त्यांना वाव देण्यासाठी ही सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहे आज या ठिकाणी महिलांच्या मॅचेस होत असून यामध्ये सुमारे 11 संघ सहभागी झाले आहेत या सर्व महिला भगिनी आजच्या प्रेरणा दिनानिमित्त क्रिकेटचा आनंद सांघिक भावना वाढीस लागण्यासाठी व महिला भगिनी एकत्र येण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याच्या त्या म्हणाल्या
तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, कुटुंबाची काळजी करणारी महिला मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. महिलांनी आरोग्य जपले पाहिजे महिलांचे आरोग्य चांगले तर कुटुंबाचे आरोग्य चांगले. आणि तरुणांनी सुद्धा मोबाईल कडून आता मैदानाकडे वळले पाहिजे. सोशल मीडियाचा अतिवापर हा घातक असून ठराविक वेळ ठरवून त्यासाठी दिला पाहिजे आणि बाकी वेळेचा वापर हा अभ्यास करियर आणि कामासाठी गेला पाहिजे. सहकार महर्षी क्रिकेट स्पर्धेमध्ये राज्यभरातून अनेक संघ या ठिकाणी खेळत असून संगमनेरकरांनाही मोठी मेजवानी मिळाली आहे याचबरोबर आज प्रेरणा दिनानिमित्त महिलांच्या होणाऱ्या सामन्यासाठी ही महिलांची मोठी उपस्थिती असल्याने सर्वांसाठी हा आनंदाचा ठेवा ठरणार असल्याचे त्या म्हणाल्या
यावेळी महिलांनी संयुक्त जयंती निमित्त राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,फातिमा बीबी, माता रमाई यांना अभिवादन केले