राजापूर च्या नूतन कला महाविद्यालयात हिंदी दिन साजरा

संगमनेर दि 14
हिंदी भाषा ही फक्त भारताची ओळखच नसून ती आपली जीवनमूल्ये आणि संस्कृतीची संवाहक आहे. सरळ, सहज आणि सुलभ असण्यासोबतच देशात मोठ्या संख्येने बोलली जाणारी शास्त्रीय भाषा आहे. असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. संजय खेमनर यांनी केले.
प्रागतिक शिक्षण संस्थेच्या नुतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याता म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. वर्पे सर म्हणाले की हिंदी भाषेच्या माध्यमातून अनेक कवी लेखकांनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी बहुमोल योगदान दिले आहे.
यावेळी विद्यार्थ्यांची मनोगते ही झाली. त्यामध्ये तोरमल भारती या विद्यार्थिनीने स्वरचित हिंदी कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. रवि गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आकांक्षा दारोळे यांनी तर आभार प्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. गुंजाळ आर. एस. यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मंचावर प्रा. डॉ. आहेर,प्रा.डॉ. संगीता जांगिड, प्रा. खतोडे, प्रा. देशमुख एस. एस. प्रा. खरात, प्रा. वाकचौरे, प्रा. हारदे, प्रा. भालेराव, प्रा. साबळे, प्रा. वाघमारे, प्रा. भालके,प्रा. जाधव, प्रा. गुंजाळ, प्रा. गडाख,प्रा. देशमुख एस. एन., प्रा. सहाणे, शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.