पारनेर तालुक्यातील 2500 लाडक्या बहिणींचे गणपती दर्शन !

गणेश दर्शनाच्या माध्यमातुन विधानसभेची तयारी सुरु ?
दत्ता ठुबे
पारनेर – गणेशोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पारनेर तालुका अध्यक्ष सुनिल थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सुमारे २५०० माता भगिनींसाठी ओझर व लेण्याद्री येथे अष्टविनायकांपैकी असणाऱ्या दोन गणपतींचे यथार्थ दर्शन आयोजित केले होते.
पारनेर तालुक्यातील सहभागी माता भागिनींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला. यावेळी सहभागी असणाऱ्या सर्वच माता महिलांना भेट वस्तू म्हणून सुनिल थोरात यांनी तालुक्यातील भगिनींचा भाऊ म्हणून साडी भेट दिली आहे. यावेळी सर्व महिलांसाठी नाश्ता,जेवण याची उत्तम व्यवस्था सुनिल थोरात व मित्र परिवाराकडून करण्यात आली होती.
यात्रेचे प्रस्थान होताना भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, माजी तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, पारनेर तालुका भाजपा सरचिटणीस दिनेश बाबर,पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक प्रसाद शितोळे,भाऊसाहेब मेचे,सुनिल पवार , दत्ता रोकडे,भाजपा जेष्ठ नेते कृष्णाजी बडवे,युवा नेते तुषार पवार,भाजपा महिला तालुकाध्यक्ष सोनाली सालके, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुषमा रावडे, शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष मनिषा सोमवंशी , निर्मलाताई सुनिल थोरात, किर्ती थोरात, अश्विनी रमेश थोरात, सुप्याचे सरपंच मनीषा रोकडे, सरपंच मनोज मुंगसे, माजी सरपंच भाऊसाहेब डेरे, माजी उपसरपंच दत्ता नाना पवार , मोहनराव खराडे ,भास्कर थोरात सर, अनिल दिवटे, भास्कर थोरात, ओंकार मावळे,भाऊसाहेब मांडगे, योगेश रोकडे, काशिनाथ नवले, गणेश पठारे, संतोष करपे , सुनिल थोरात मित्र परिवार व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजपा नेते सुनिल थोरात बोलताना म्हणाले की, पारनेर तालुक्यातून प्रथमच गणेशोत्सव काळात येवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांना गणपती देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आलेले असून यापुढे नवरात्रोत्सवामध्ये वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला पारनेर-नगर मतदारसंघातील सर्वच महिलांना घेऊन जाणार असल्याचे थोरात यांनी जाहीर केले. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष म्हणून मला जी संधी मिळाली आहे , त्याचा उपयोग सर्वच माता भगिनींच्या हितासाठी करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आणि महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण कायमच प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
महिलांसाठी सुनिल थोरात यांनी राबविलेल्या यात्रेचे सर्वच उपस्थितांनी कौतुक करुन आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून सुनिल थोरात यांनाच संधी मिळावी , अशाही भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी थोरात यांनी महिलांना कोणतीही अडचण येऊन दिली नाही आणि प्रत्येक गावगावात त्यांनी जाऊन महिलांना आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी केलेल्या कष्टाची पावती महिला भगिनी ही नक्कीच त्यांना विधानसभेत पाठवून देतील अशाही भावना महिलांनी मोठ्या प्रमाणावर व्यक्त केल्या.
महिलांच्या यात्रेच्या माध्यमातुन सुनिल थोरात हे विधानसभा निवडणुकीत उतरले असल्याची चर्चा आता तालुक्यात होत असून महायुतीमधील अनेक इच्छुकांच्या शर्यतीत थोरात यांनीही उडी घेतल्याने आता महायुतीच्या नेतेमंडळींची नक्कीच डोकेदुखी वाढणार आहे. गणेश दर्शनाच्या माध्यमातुन विधानसभा दर्शनाचीच तयारी सुनिल थोरात यांनी केल्याचे बोलले जात असून निवडणुक प्रचाराचाच श्रीगणेशा थोरात यांनी सुरु केल्याचे यावेळी दिसून आले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची यात्रेची फोनवरून काळजीपूर्वक चौकशी व उपक्रमास शुभेच्छा –
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुनिल थोरात यांच्याशी फोनवरून संपर्क साधत यात्रेची काळजीपूर्वक चौकशी केली. कोणतीही अडचण येणार नाही , याचाही त्यांनी काळजी घेण्याच्या सूचना केल्या , तसेच सुनिल थोरात यांचे विखे पाटील यांनी कौतुक करत यात्रेत सहभागी महिलांशीही फोनवरुण संवाद साधला व थोरात यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

भाजपाकडून सुनिल थोरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात –
विधानसभा निवडणुकीचे पडघम पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात वाजायला सुरुवात झाली असून विविध पक्षांकडून अनेकजण तयारीला लागले असल्याचे दिसून येत आहे , विविध कार्यक्रमांद्वारे उमेदवारीसाठी इच्छुकांनी तसे संकेत दिले आहेत. यामध्ये आता सुनिल थोरात यांनीही उडी घेतली असून विधानसभा निवडणुक लढण्याची त्यांच्या मनातली इच्छा लपून राहिलेली नाही आणि त्यासाठी त्यांनी आपण सज्ज असल्याचे महिलांच्या मोफत गणपती देवदर्शन यात्रेतून दाखवून दिले आहे आणि यात्रेमध्ये तशी चर्चाही सुरु असल्याचे दिसून आले आहे.
महायुतीमध्ये आणखीन किती इच्छुक वाढणार –
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरु केली असून आता सुनिल थोरात यांनीही आपले मनसुबे जाहीर केले आहेत. यामुळे पक्षश्रेष्ठी नक्की कोणाला संधी देणार , याकडे पुढील काळात मतदारसंघाचे लक्ष असणार आहे. तसेच आणखीन किती इच्छुक निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार यावर पण निवडणुकीची गणिते अवलंबून असणार आहेत.
जिल्हात प्रथमच महिलांसाठी साडी वाटप –
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक व्यक्तींकडून महिला देवदर्शनचे आयोजन यापूर्वी करण्यात आले होते परंतु कोणीही महिलांना साडी वाटप केले नाही . प्रथमच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पारनेर तालुकाध्यक्ष सुनिल थोरात यांच्या माध्यमातून महिला साडी वाटप करण्यात आले याबद्दल महिलांकडून कौतुक करण्यात आले.