कॅप्टन ज्ञानेंद्र सिंघ यांचा सन्मान

आदिवासी कार्याचा गौरव! महाराष्ट्र राज्य दौऱ्यावर असलेल्या, बिहार राज्य स्थित कॅप्टन मा.ज्ञानेंद्र सिंघ सर यांचा ज्येष्ठ आदिवासी सेवक डॉ.वाळीबा वि पोपेरे यांचा व्हिजन इंडिया या संस्थेच्या माध्यमातून, विशेष सत्काराचे आयोजित करण्यात आले होते. समुद्री क्षेत्र माध्यमातून विविध राष्ट्रातील संस्थांद्वारे समुद्री विशेषज्ञ म्हणुन कार्यरत कॅप्टन मा.श्री ज्ञानेंद्रजी सिंघ सर यांचे कार्य महाराष्ट्रातील युवांना परिचित व्हावे यासाठी सदर उपक्रम राबविला होता. सत्काराला उत्तर देताना मा.सिंघ यांनी डॉ. पोपेरे यांच्या अफाट कार्याचा गौरव केला. तसेच त्यांची प्रसिद्ध कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवांनी पुढाकार घावा असे आवाहन याप्रसंगी बोलताना श्री सिंघ यांनी केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थिती दर्शविली होती.🙏🙏