शिंदे व फडणवीस सरकारचे शेवंगावात फटाके फोडून स्वागत

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासह इतर मित्र पक्षातही आनंद साजरा करण्यात आला
.
शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वाय डी कोल्हे यांच्या उपस्थितीत फटाके फोडून या निवडीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी ह. भ. प. कल्याण महाराज पवार, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गुरुनाथ माळवदे, शेवगाव तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस लक्ष्मण काशीद, देवटाकळी विकास संस्थेचे उपाध्यक्ष मुसाबाई शेख, बशीरभाई पठाण, रासपाचे आत्माराम कुंडकर कल्याण जगदाळे, आप्पासाहेब सुकाशे, शरद थोटे, टिल्लूभाई पठाण यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते