तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोतुळ येथील सावित्रीबाई फुले विद्यालयास प्रथम क्रमांक

अकोले प्रतिनिधी
: सत्यनिकेतन संस्थेचे संस्थापक सचिव कै.रा.वि. पाटणकर यांनी आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजूर येथे संपन्न झालेल्या आंतरविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी या गटात स्वर्गीय बाबुराव सखाराम बोऱ्हाडे (बी .एस .बी) एज्युकेशनल संस्था उल्हासनगर 4 संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोतुळ विद्यालयाची विद्यार्थिनी कु. देशमुख स्वरा विशाल हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
कु. स्वरा देशमुख हीस मान्यवरांच्या हस्ते रुपये २१०१ ,फिरता चषक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या वक्तृत्व स्पर्धेतील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विजेत्या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय उपेंद्रजी बोऱ्हाडेसाहेब ,उपाध्यक्षा सौ.सुलभा बोऱ्हाडे, सचिव सौ. अपर्णा साळुंके ,शाळेचे मुख्याध्यापक श्री देशमुख एस्. एम्. सर , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी देशमुख, मेजर श्री रामदास देशमुख, पालक श्री विशाल देशमुख, अंगणवाडी ताई सौ. कल्याणी देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

स्पर्धेतील सहभागी तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना शिक्षक श्री. हरिश्चंद्र काळे ,सौ. सुनीता खुर्पे, श्री .सुहास देशमुख, श्री .राजेंद्र आरोटे ,श्री. दिलीप देशमुख ,श्री. भास्कर कातोरे, श्री कैलास बो-हाडेसौ.चेतना पवार( गुंजाळ) सौ.सुमिता बो-हाडे (पंडित)यांचे मार्गदर्शन लाभले.
