पारनेर मधील वारंवार खंडित वीज पुरवठ्या बाबत राष्ट्रवादी चे निवेदन

पारनेर प्रतिनिधी
पारनेर शहरासह संपूर्ण तालुक्यांतील महावितरण कंपनी कडून होणारा वीजपुरवठा कोणतीही पूर्व सूचना न देता वारंवार खंडित होत असल्याच्या प्रकार वाढला आहे. त्या मुळे शेतकरी, उद्दोजक, परीक्षार्थी विद्यार्थी, वीज ग्राहक यांना नाहक मानसिक त्रास होत असल्याने हि समस्या तातडीने सभंधित विभागाने सोडविण्यासाठी पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( शरदचंद्र पवार) वतीने महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रा. या औटी, युवा नेते राजेश चेडे,पारनेर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब शेटे, पारनेर शहर समन्वयक सचिन नगरे उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पारनेर शहरासह तालुक्यांतील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीज पुरवठा मधील अनियमततेमुळे नागरिकांना मोठया प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थ्याना अभ्यासात अडथळा निर्माण होतो.वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठामुळे पारनेर शहरासह तालुक्यातील नागरीक त्रस्त झाले आहेत.अखंडित व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा व योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयात उपोषण करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.