इतर
शेवगावात छत्रपती स्मारकाचा पायाभरणीचा उद्या शुभारंभ

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगावच्या वैभवात भर घालणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारकाचे उद्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पायाभरणी शुभारंभ होत आहे.
या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातील तमाम नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी अकरा वाजता हा शानदार कार्यक्रम होईल असे संयोजक समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी तालुक्यातील भावी निमगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वरुढ स्मारकाचे लोकअर्पण मोठ्या उत्साहात झाले होते.