माळी महासंघाच्या अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष पदी कैलास लक्ष्मण भरितकर यांची निवड…..

संगमनेर/प्रतिनिधी
माळी महासंघाच्या अहमदनगर उत्तर नगर जिल्हाध्यक्ष पदी कैलास लक्ष्मण भरितकर यांची निवड केल्याची घोषणा माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अरुण तिखे साहेब यांनी केली आहे.
श्री कैलास भरीतकर यांनी यापूर्वी समता परिषद ,महात्मा फुले प्रतिष्ठान ,आणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजसेवेच्या केलेल्या अविरत कार्याची दखल माळी महासंघाने घेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. माळी महासंघाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने कैलास भरीतकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
यावेळी माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अरुणजी तिखे साहेब, सचिव -चंद्रशेखर दरवडे, दत्तूशेठ गडगे, रामचंद्र मंडलिक, संपतशेठ गलांडे, बंटी मंडलिक, अतुल अभंग, सचिन भरीतकर, अविनाश वाव्हाळ, संतोष पठाडे, कैलास तुळशीराम भरीतकर, सुभाष भरीतकर, भारत अभंग, भगवान गिते, दिपक भगत, सीताराम मोहरीकर, राहुल भोईर अदि पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
श्री कैलास भरीतकर यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजपचे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, भाजपचे शहर अध्यक्ष ॲड श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष सतीश कानवडे, नगरसेविका सौ मेघाताई भगत, सौ रेखाताई गलांडे, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस भारत गवळी आदी मान्यवारांनी अभिनंदन केले..