वडगाव ढोकचे भुमीपुत्र कृष्णा ढाकणे, बदाम शिरसाठ यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

गणेश ढाकणे
बीड गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथील कृष्णा ढाकणे व बदाम शिरसाठ याने नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फतच्या परीक्षेत यश संपादन करत क्रुष्णा ढाकणे व बदाम शिरसाठ याची पी एस आय या पदावर निवड झाली आहे. क्रुष्णा व बदाम यांचे आई वडील हे शेती करतात. परिस्थितीशी दोन हात करत क्रुष्णा व बदाम हे दोघे गेल्या 6 वर्षा पासून पुण्यात एमपीएससीची तयारी केली. सलग 4वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली आहे. त्यानंतर आज क्रुष्णा व बदाम यांना हे यश संपादन केले आहे. पी. एस. आय. या पदावर न राहता आणखी पुढे जाऊन येणाऱ्या काळात डी वाय एस पी ही पदवी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. त्याच्या या यशाबद्दल वडगाव ढोक येथे मंगळवारी गावकऱ्यांच्या वतीने गावातून भव्य मिरवणूक काढत नागरी सत्कार करण्यात आला.