युवकांनी देश सेवेचे व्रत हाती घ्यावें – संजय निमसे चिचोंडी पाटील येथे निमसे यांचा सपत्नीक सत्कार

संजय महाजन
भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग उत्तर महाराष्ट्र तसेच चिचोंडी पाटील ग्रामपंचायत चिचोंडी पाटील , बबनराव शेळके मित्र मंडळ नगर तालूक्याच्या वतीने . नगर तालुक्यातील हतुळन देवीचे येथील संजय रावसाहेब निमसे पाटील मेजर हे मुंबई येथील वरळी या ठिकाणी पोलीस दलामध्ये भरती झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक मंगल निमसे पाटील यांच्यासहित सत्कार आयोजित करण्यात आला . यावेळी चिचोंडी पाटील येथील पोपट कोकाटे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
मेजर सुरेश निमसे पाटील यांनीं मिलिटरी मध्ये सर्विस केल्यानंतर रिटायर झाले. त्यानंतर तीन वर्ष त्यांनी शेतीचे डेव्हलप केले. आणि चौथ्या वर्षी पुन्हा पोलीस दलामध्ये भरती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. याप्रसंगी निमसे पाटील म्हणाले की युवकांनी व्यसनाधीन होण्यापासून प्ररावृत्त व्हावे. आणि देश सेवेचं व्रत हाती घेऊन विविध सामाजिक क्षेत्रात काम करावे.चांगल्या पधदतीचा व्यवसाय करावा किंवा पोलीस आणि मिलिटरी मध्ये भरती होण्यासाठी चांगल्या पद्धतीचा व्यायाम करावा , रनिंग करावे, अभ्यास करावा.देश सवा करावी, देश सेवेबरोबरच आपल्या आई-वडिलांची ही सेवा त्यांनी करावी असा या सत्कार समयी ते म्हणाले
संजय निमसे पाटील आणि मंगल निमसे पाटील यांचा सत्कार ह. भ. प. स्वप्नील महाराज पवार, चिचोंडी चे सरपंच युवा सरपंच शरद भाऊ पवार, आणि भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे बबनराव शेळके , सोसायटीचे चेअरमन महादेव खडके यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी माजी चेअरमन राजेंद्र कोकाटे , मा. प्राचार्य एच जी कोकाटे सर, जिल्हा परिषदेचे मा. प्राचार्य बाबासाहेब पवार सर , रीटायर पी.एस.आय रफीक़ सय्यद , रीटायर शिक्षक गंगाधर देवकर सर, आबासाहेब वाडेकर, संभाजी खडके, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे, मा. ग्रा.प. सदस्य संतोष कोकाटे, लोकमान्य पतसंस्था संचालक अरुण दवणे, लोकमान्य पतसंस्था संचालक दत्तात्रय कोकाटे ,दत्तात्रेय शेळके, संतोष वाडेकर, सोसायटीचे माजी सचिव राम ठोंबरे, चंदू पावणे, कल्याण जगताप पाटील , धोंडीराम आगलावे, सामाजिक कार्यकर्ते शहाजी गोरे, शिवाजी कोकाटे, सोसायटी सदस्य बबन कोकाटे , रावसाहेब कोकाटे ,राजेंद्र तनपुरे , अंबादास कोकाटे भोजाभाऊ गव्हाणे, राजू कोकाटे, मेटेज्ञपाटील, बाबुराव शेळके , हरून मनियार बन्सी आगलावे, आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना सरपंच शरद भाऊ पवार यांनी केली तर आभार बबनराव शेळके यांनी मानले.