धनगर धार्जिण्या व आदिवासी समाज विरोधी धोरणांचा जाहीर निषेध करत रस्ता रोको आंदोलन

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी….
धनगर धार्जिण्या व आदिवासी समाज विरोधी धोरणांचा जाहीर निषेध करत रस्ता रोको आंदोलन. आज बारी येथे आदिवासी बांधव यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
शासनाने जी समिती स्थापन करण्यात आली आहे रद्द करावी.धनगर समाजास.आदिवासी मध्ये आरक्षण देवु नये. आदिवासी समाजाच्या मध्ये केलेली घुसखोरांवर कारवाई करण्यात यावी आदिवासी १७ संवर्गातील पेसाभरती अमलबजावनी तातकाळ करावी. शासनाने मानधन तत्वावर घेतलेला निर्णय रद्द करावा. आदिवासी बजेट अन्य विभागात न वापरता आदिवासी समाजाच्या विकासासाठी वापरावा.

या मागणयासाठी समाज बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तुकाराम खाडे. अनंत घाणे. भरत घाणे. डॉ .पोपेरे .दता देशमुख.गगाराम धिदळे.ज्ञानेशवर झडे.पांडुरग खाडे. बाजीराव सगभोर. मोहन खाडे. यांनी मनोगत व्यक्त करतांना समाजाचे विविध प्रश्नांवर मतं व्यक्त केली शिंदे सरकारनी धनगरांना आरक्षण देण्याचा जो घाट घातला आहे त्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. मा. मंत्री मधुकरराव पिचड यांनी सत्तेच्या काळात गोवारी समाज , धनगर यांना आदिवासी समाजात आरक्षण देण्यास सक्त विरोध केला व मंत्री पदाचा राजीनामा दिला. सत्तेत असताना आदिवासी नऊ टक्के बजेट वेगळे केले. आदिवासी समाजात घुसखोरी होऊ नये म्हणून जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालय सुरू केले. सरकार ने पेसा भरती करताना कायमस्वरूपी भरती करावी. मानधनावर भरती करू नये. पदे भरू नये. अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनात सहभागी कार्यकर्ते समाज बांधव सुरेश गभाले. मारुती खाडे. अंकुश भवारी. सचीन भवारी. योगेश खाडे. देवेंद्र खाडे. पोपेरे सर. दता ढगे. कुंडलीक घारे. दतु खाडे किसन खाडे. भिमराज अवसरकर. मदन खाडे. बाळु खाडे. रामदास पिचड. विठल खाडे. अशोक भोजने. गोरख खाडे. शिवाजी खाडे. जाखेरे. राहुल पवार. सह अकोले तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित होते.

यावेळी API सरोदे व नायब तहसीलदार लोहरे , भांगरे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे सुत्र संचालन सामाज सेवक अनंत घाणे यांनी केले. आभार सरपंच तुकाराम खाडे यांनी मानले.