पत्रकार सुरेश खोसे पाटील यांची पत्रकारिता निर्भीड व गौरवास्पद .सौ. शालिनीताई विखे पाटील .

पारनेर – पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. पत्रकारिता ही नेहमीच निर्मळ पाण्यासारखी प्रवाही असावी लागते , तेंव्हाच जनमानसांत त्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असतात. प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून जनमानसात प्रबोधनाचे कार्य चालते. पारनेर तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले दैनिक पारनेर समर्थ चे संपादक सुरेश खोसे पाटील हे याच परंपरेचे पाईक आहेत. त्यांच्या निर्भीड व वैचारिक पत्रकारितेचा सन्मान म्हणूनच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा सचिवपदी त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा देत अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी पत्रकार सुरेश खोसे पाटील यांचा शाल व फुलांचा गुच्छ देवून त्यांच्या पत्रकारितेचा गौरव केला.
याप्रसंगी खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील युवा मंचाचे पारनेर तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर, पाडळी आळे गावचे माजी सरपंच भाऊसाहेब डेरे व इतर मान्यवर व कार्यकर्ते या सन्मान कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. पारनेर तालुक्यात सुरेश खोसे पाटील यांचे या सचिवपदी झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे .