शासनाच्या मोफत आरोग्य शिबिरांचा जनतेने लाभ घ्यावा- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे

कोतुळ प्रतिनिधी
शासनाच्या मोफत आरोग्य शिबिरात सर्व प्रकारच्या आजारांचे निदान व उपचार केले जातात जनतेने या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी केले
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन डॉ. संजय घोगरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश काका देशमुख होते
ते पुढे म्हणाले की जिल्ह्यात अकोले तालुका आदिवासी दुर्गम भाग आहे या भागात मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते सर्वसामान्य जनतेला दूरवर जाऊन महागडे उपचार करता येत नाही यासाठी सामान्य जनतेला शिबिरात उपचार व ऑपरेशनची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी या शिबिरांचे आयोजन केले जाते या शिबिरांचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा अकोले तालुक्यासाठी या शिबिरांचे आयोजन केले जाते रुग्णांचे शंका निरसन आणि योग्य उपचार करून रुग्णांचे समाधान होईल यासाठी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी प्राधान्याने काम करावे अशा सूचना त्यांनी केल्या
जिल्हा परिषद सदस्य रमेश काका देशमुख म्हणाले की करोना काळात सर्वाधिक त्रास आरोग्य आणि पोलीस यंत्रणेला झाला यंत्रणा तीच असते पण अधिकारी बदलत असतात काही कामचुकारांमुळे चांगले काम करणाऱ्यांची ही बदनामी होते। प्रत्येकाने जबाबदारीने काम केल्यास अडचणी येत नाही असे श्री देशमुख म्हणाले
याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शामकांत शेटे ,डॉ दत्तात्रय लहामटे, डॉ. सुरेखा पोपरे यांनीं यावेळी मनोगत व्यक्त केले

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णकांत वानखेडे यांनी प्रास्ताविकात मोफत आरोग्य शिबिराची माहिती दिली डॉ. कडलग यांनी सूत्रसंचालन केले तर सर्जेराव खंडागळे यांनी उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी सरपंच भास्कर लोकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बबलू देशमुख, डॉ रामनाथ दिघे, डॉ इंद्रजीत गंभीरे आदींसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व कोतुळ परिसरातून आलेले रुग्ण व ग्रामस्थ उपस्थित होते