धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा : शेतकरी नेते दशरथ सावंत

बीड मधील सरपंच हत्येच्या निषेधार्थ अकोले शहरात बंद
मराठा समाजाचा अकोले शहरातून मोर्चा व ठिय्या आंदोलन
अकोले प्रतिनिधी |
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या निषेधार्थ व त्याच्या मारेकऱ्यानां फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी बुधवारी अकोले शहरात बंद पाळण्यात आला.धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ज्येष्ठ शेतकरी नेते: दशरथ सावंत यांनी केली
मराठा समाजबांधवानी शहरातून मोर्चा काढून बस स्थानक चौकात ठिय्या आंदोलन केले.अकोले शहरातील बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या निषेधार्थ मराठा समाजासह सर्व समाज बांधवांनी शहरातून मोर्चा काढून स्थानक चौकात ठिय्या आंदोलन केले.
बीड जिल्ह्यातीलघटना संपूर्ण राज्याला हादरवणारी क्रूर घटना आहे. याघटनेतील आरोपीना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी. या घटनेचे धागेदोरे
राजकारणापर्यंत जात आहेत.त्याचे मंत्रालयापर्यंत कनेक्शन आहे. मुख्यमंत्री यांनी ते शोधून मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे तत्काळ मंत्रिपदकाढून घ्यावे. राज्यातील सर्वपक्षीय आमदारानी एकत्र येवून विधानसभेत एकमताने ठराव करून धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, असे मत ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी व्यक्त केले.
दशरथ सावंत, नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख, भाजपचे तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, आरपीआय नेते विजयराव वाकचौरे, बी. जे. देशमुख, महेशराव नवले, डॉ. संदीप कडलग, डॉ. असिफ तांबोळी, नितीन नाईकवाडी, बाबासाहेब नाईकवाडी, सचिन शेटे, मनसेचे दत्ताभाऊ नवले, सरपंच प्रदीप हासे, प्रणाली धुमाळ, अॅड. अनिकेत चौधरी, राजेंद्र गवांदे, राहुल शेटे, संदीप शेणकर, अक्षय अभाळे, ईश्वर वाकचौरे, संतोष नाईकवाडी, विशाल देशमुख, अंकुश वैद्य आदी उपस्थित होते.

. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. सकाळी महात्मा फुले चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला.
बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. सरपंच देशमुख यांच्या खुनातील सर्व आरोपीना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, खटला फास्ट ट्रॅ कोर्टात चालवावा, सर्व आरोपीवर मोक्का लावावा आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्याकडे देण्यात आले.
