अहमदनगर

शेवगाव शहरातील रेड लाईट एरियाचे नाव आता शांतीनगर

महिला दिनाचे औचित्य साधत नामकरण


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी

शेवगांव शहरातील खऱ्या अर्थाने कायम उपेक्षित असलेल्या आणि अपघाताणें या व्यवसायात पडलेल्या महिलांना खरी मदतीची गरज आहे. या जाणीवेतून स्वाभिमानी शेतकरी संघटना, मराठा सेवा संघ शेवगांव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरातील विविध सामाजिक संघटना आणि नीत्यसेवा हॉस्पिटल च्या स्टाफ आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या. या वेळी मान्यवरांच्या हस्ते शांतीनगर नामकरण बोर्ड चे अनावरण करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रा. किसनराव माने मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष विजयराव देशमुख, म.न.से. तालुका अध्यक्ष गणेश रांधवने, शेवगांव कृ. ऊ. बा. चे माजी चेअरमन संजय फडके, बळवंत देशमुख, सौ. मीनाताई काळकुंबे, डॉ. दादासाहेब काकडे, विक्रमराव दारकुंडे, विष्णु घनवट,जेष्ठ पत्रकार आबा लांडे, अंकुश देवढे, राजेंद्र झरेकर, शरद जोशी, शेतकरी संघटनेचे दत्ताभाऊ फुंदे, बाळासाहेब फटांगडे, बाळासाहेब गर्जे, अमोल देवढे, सुनील काकडे, जनशक्ती गणेश डोमकावळे, प्रहारचे तालुकाध्यक्ष रामजी शिदोरे, विजय शिंदे, जगदीश आरेकर, मेजर भोसले, नित्यसेवा हॉस्पिटलच्या सिस्टर बेट्टी सिस्टर चेन्नम्मा, सिस्टर चंदा,महिलांसाठी काम करणाऱ्या स्नेहालय संस्थेच्या जया जोगदंड, आशा भताने, लता ढाकणे यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतें मा. तहसीलदार शेवगांव यांना या पीडित महिलांना शहरात गावठाण हद्दीत महसुल विभागामार्फत दोन गुंठे जागा आणि घरकुल मिळण्यासाठी तहसीलदार शेवगाव आणि नगरपरिषद शेवगांव यांचेकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी मीनाताई काळकुंबे आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
शांतीनगर फलकाचे अनावरण
या वेळी नामकरण फलकाचे अनावरण करून उपास्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पीडित महिलांना साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सुत्रसंचालन पत्रकार अविनाश देशमुख यांनी केले. प्रस्ताविक प्रशांत भराट यांनी केले. यावेळी माने सर घनवट सर संजय नांगरे मीनाताई कळकुंबे डॉ. दादासाहेब काकडे यांनी मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन सुनील काकडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button