राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य ,दि.11/ 10 /2024

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन १९ शके १९४६
दिनांक :- ११/१०/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०८,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति १२:०७,
नक्षत्र :- उत्तराषाढा समाप्ति २९:१५,
योग :- सुकर्मा समाप्ति २६:४६,
करण :- बालव समाप्ति २३:३८,
चंद्र राशि :- धनु,(११:४१नं. मकर),
रविराशि – नक्षत्र :- कन्या – चित्रा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:४८ ते १२:१६ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:५१ ते ०९:१९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:१९ ते १०:४८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:१६ ते ०१:४४ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास, मन्वादि, सरस्वती बलिदान, आयुध नवमी, एकरात्रोत्सवारंभ, दग्ध १२:०७ प., नवमी श्राद्ध,
————–

राशिभविष्य

मेष
चांगली मन:शांती लाभेल. नवीन नोकरीसाठी विचारणा होईल. सारासार विचार आणि सकारात्मकता ठेवा. कामे सुलभतेने पार पडतील. आपले ध्येय गाठण्यासाठी हर संभव प्रयत्न करा.

वृषभ
जोडीदाराच्या मताचा विचार करावा. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. व्यापारा निमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील. नवीन मित्रांशी संवाद वाढेल. फसवणुकीपासून सावध राहावे.

मिथुन
नातेवाईकांशी संबंध सुधारतील. धाकट्या भावंडांना मदत कराल. दिवस मध्यम फलदायी. अपेक्षित कमाईची कामना मनात बाळगाल. मनातील विचारांना आळा घालावा लागेल.

कर्क
पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. जोडीदाराविषयी नाराजी चटकन दर्शवू नका. जवळचे मित्र भेटतील. गप्पांचे फड जमवाल. क्षुल्लक मतभेद होण्याची शक्यता.

सिंह
कामात नवीन अधिकार हाती येतील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. भावंडांच्या सहवासात रमून जाल. जवळच्या ठिकाणी भेट द्याल. छंद जोपासायला वेळ काढाल.

कन्या
अतिरिक्त पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करावी. आपल्याकडून दानधर्म केला जाईल. घरातील वातावरण आनंदी व खेळकर राहील. आपले विचार खुलेपणाने मांडाल. गायन कलेला चांगला वाव मिळेल.

तूळ
घरासाठी पैसे खर्च कराल. मनात योजलेले काम पूर्ण कराल. समस्यांचे निराकरण होऊ शकेल. नव्या संधीमुळे मनावरील ताण कमी होईल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल.

वृश्चिक
द्विधा मन:स्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. दिवस धावपळीत जाईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल.

धनू
जोडीदाराकडून कौतुक केले जाईल. समोरच्या व्यक्तिला शब्द देताना सावध रहा. संमिश्र घटना जाणवू शकतात. झोपेची तक्रार जाणवू शकते. जुने मित्र भेटतील.

मकर
दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरासंबंधी कामात कौटुंबिक सदस्यांची मते विचारात घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. जोडीदाराची साथ व सहकार्य लाभेल. अनिश्चिततेचे मळभ दूर होईल.

कुंभ
मोठ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. समोरच्या व्यक्तिला विश्वासात घेऊन काम करा. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. मिळालेल्या संधीचे सोने करावे. बोलतांना भान हरवू नका.

मीन
अनेक दिवस अडून राहिलेले काम पूर्ण होईल. समोरच्यावर संपूर्ण विश्वास टाकू नका. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना लाभाचा दिवस. अचानक धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button