कोपरगावची बाजारपेठ फुलविण्यात सहकाराचा मोठा वाटा – पराग संधान

वसंतदादा मल्टीस्टेट कोपरगाव शाखेचे स्थलांतर
शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
सहकारी बँका व्यवसायिकांना वेळेवर अर्थसाहाय्य करतात म्हणून कोपरगाव शहरातील बाजारपेठ फुलविण्यात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा असल्याचे मत शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक, अमृतकेन शुगरचे चेअरमन पराग संधान यांनी व्यक्त केले. नुकताच विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेच्या कोपरगाव शाखेचा स्थलांतर सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक तर अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर उपस्थित होते.
वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त कोपरगाव शाखा नुकत्याच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शहराच्या मुख्य बाजारपेठेत प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी सपत्नीक श्री सत्यनारायण पूजा केली. शहरातील अनेक प्रमुख मान्यवरांनी व ग्राहक सभासदांनी दिवसभर शाखेत भेट देऊन शुभेच्छा दिल्यात. यावेळी बँकिंग निगडित संस्थेच्या सर्व डिजिटल सेवांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यानंतर संचालक मंडळाच्या वतीने शाखेतील कुशल कर्मचारी यांची मिटिंग घेऊन प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संचालक सर्वश्री दीपक धट, किशोर परजणे, पुरुषोत्तम पगारे सर यांच्यासह प्रशांत होन, विष्णू पाडेकर, सतीश गुजराथी, रंजन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरव्यवस्थापक गणेश वाळुंज, कर्जविभागप्रमुख अनिल कापसे, शाखा व्यवस्थापिका सौ.अनुराधा रणदिवे, सहव्यवस्थापक आशुतोष शिंदे, कॅशिअर अक्षय लोखंडे, मदतनीस अमोल आदमने आदींनी मेहनत घेतली.