स्वर्गीय घुलेकडून आम्हाला समाजकार्याची शिकवण राजश्रीताई घुले

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव पाथर्डी मतदार संघात हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा लागेल. तेव्हाच विकास कामात गती आणता येईल. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यासाठी भरीव निधी आणता आला याचे समाधान वाटते. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राजकारणाबरोबरच समाजकारण करण्याची समाजकार्याची शिकवण लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या समाजकार्य पासूनच आम्हाला मिळाली आहे. असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी मांडले. शेवगाव तालुक्यातील दहीगाव ने गणातील शहरटाकळी भाविनिमगाव मजलेशहर व भातकुडगाव जिल्हा परिषद गटातील भायगाव येथे विविध विकास कामाचेभूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या सभेच्या सांगता प्रसंगी सौ. राजश्रीताई घुले बोलत होत्या.
यावेळी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, लोकनेते मारुतराव घुले पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक सखाराम लव्हाळे,भायगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष अँड. लक्ष्मणराव लांडे, भायगावचे सरपंच हरिभाऊ दुकळे, माजी सरपंच अशोकराव दुकळे, रामनाथ आढाव, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक भगवानराव आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विठ्ठल आढाव, विद्यमान चेअरमन कल्याण आढाव, जनार्दन लांडे, प्रगतशील शेतकरी शेषेराव दुकळे, अण्णासाहेब दुकळे, विठ्ठल फटांगरे, अँड. सागर चव्हाण, दगडू दुकळे, बबन सौदागर, विलास लोखंडे, गणेश देशमुख, शिवाजी लांडे, कडूबाळ दुकळे, सदाशिव शेकडे, विठ्ठल रमेश आढाव, अनिल लांडे, सुनील शेकडे, रमेश आढाव, आदित्य लांडे,नारायण दुकळे, नारायण आढाव,आर. आर. माने, सतीश आढाव, आप्पासाहेब सौदागर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश दुकळे यांनी केले तर आभार कल्याण आढाव यांन मानले.
मुळा धरणाचे पाणी असो वा विज प्रश्न यावर आपण सातत्याने संघर्ष करूनच प्रश्न सोडवले आहेत. यापुढील काळातही आपण शेतकरी व सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी केव्हाही रस्त्यावर उतरू, आपल्याला संघर्षातूनच विकास कामे करायचे आहेत. तालुक्याच्या विकास कामासाठीच मी राजकारणात आलो आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी शेवगाव तालुक्याला मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले व निधी मिळविण्यात यशही आले जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला अनेक गावात विकास कामे करता आले याचे समाधान वाटते.
डॉ. क्षितिज घुले
सभापती पंचायत समिती शेवगाव
भायगाव बक्तरपुर शीव रस्ता ते पांढरे वस्ती पर्यंतचा असणारा अर्धा किलोमीटरचा रस्ता व पुनर्वसित काळेगाव ते जुना कुकाना रोड हा शिवरस्ता प्राधान्याने करावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करीत आहे. अनेक दिवसापासून या रस्त्या वरून ये-जा करण्यासाठी शेतकरी वर्ग सह शाळकरी मुलांना मोठी कसरत करावी लागत आहे. विविध विकास कामासाठी भायगावला एक कोटी 82 लाख रुपये भरीव निधी दिल्याबद्दल सौ राजश्रीताई चंद्रशेखर घुले व डॉ. क्षितिज घुले यांना माजी आमदार चंद्रशेखर घुले व लोकनेते मारुतराव घुले पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामाचा डोंगर उभा करता आला. जिल्हा परिषद, पंचायत समिती मधून मोठा निधी मिळाल्याबद्दल सामान्य जनतेत समाधान व्यक्त होत आहे.
अँड.लक्ष्मणराव लांडे
माजी चेअरमन भायगाव