सुगाव फाटा- वाशेरे घाट -कोतुळ रस्त्यावरील दर्जाहीन कामाचा केला पडदा फास

अकोले/ प्रतिनिधी
संथ गतीने सुरू असलेल्या रस्ता कामाची तक्रार करताच सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेऊन काम सुरू केले, मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या निषेधार्थ आर पी आय च्या कार्यकर्त्यांनी कामावर भेट देत कामाचा पडदा फास केला अत्यल्प डांबर वापरून रस्ता चे काम उरकण्याची सपाटा सुरू केल्याचा आरोप आर पी आय चे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केला आहे
खडी पसरविण्यापूर्वी डांबराचा फवारा मारून नंतर खडी पसरविण्याचे काम करणे व त्यानंतर पुन्हा डांबराचा फवारा मारणे आवश्यक असताना तसे न करता थेट खडी पसरून त्यावर अत्यल्प डांबराचा फवारा मारला जात असल्याचे लक्षात आल्याने श्री विजय पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कामावर भेट देत दिली व वस्तुस्थिती जाणून घेतली श्री पवार यांनी हातात पावडे घेऊन रस्ता खोदून पाहिला असता खडीच्या खाली कुठल्याही डांबराचा थर आढळून आला नाही डांबरी रस्त्याची खडी सहजगत्या मोकळी होत असल्याचे दिसून आले हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता आहे अकोल्याच्या दक्षिण भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्याने होत असल्याने रस्ता दर्जात्मक व अंदाजपत्रका प्रमाणे न झाल्यास रस्त्याचे काम बंद पाडले जाईल असा इशारा श्री पवार यांनी दिला आहे

कंत्राटदारांने डांबरी रस्त्यावर जेसीबीच्या साह्याने थातूर मातूर रेघोट्या मारून रस्ता खडबडीत करून ठेवला आहे याची धूळ व खडे प्रवासात लोकांच्या डोळ्यात जात आहे यामुळे अपघात होत आहे वाहनचालकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सर्व लांबीमध्ये रस्ता खडबडीत करून ठेवल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे यामुळे दुचाकी ,चार चाकी ,वाहन चालकांना तसेच मालवाहतूक ,दूध वाहतूक यासारख्या वाहनांना अडचणींना सामना सामोरे जावे लागत आहे
सुगाव फाटा ते वाशेरे घाट या दरम्यान रस्तात काही ठिकाणी मोऱ्यांचे काम हाती घेतले आहे त्यासाठी हलक्या दर्जाचे साहित्य वापरले जात आहे सदर रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम करून तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे अंदाजपत्रकाप्रमाणे काम न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आर पी आय चे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी दिला आहे
—– / —–